---Advertisement---
नोकरी संधी

रेल्वेत नोकरीचा गोल्डन चान्स ! तब्बल 5636 पदांची भरती, 10वी पास असाल तर त्वरित अर्ज करा..

---Advertisement---

Northeast Frontier Railway Bharti 2022 : रेल्वेत नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक खुशखबर आहे. कारण RRC ने नॉर्थ फ्रंटियर रेल्वेमध्ये विविध शिकाऊ पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. ज्याद्वारे विविध युनिट्सच्या अनेक ट्रेड अप्रेंटिस पदांची भरती केली जाईल. या पदांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार 1 जून 2022 रोजी भरतीसाठी जारी केलेले सर्व तपशील तपासल्यानंतर ऑनलाइन अर्ज सादर करू शकतील. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 30 जून 2022

atm card 1 jpg webp

रिक्त जागा तपशील
भरती प्रक्रियेद्वारे विविध ट्रेडमध्ये शिकाऊ उमेदवारांची एकूण 5636 पदे भरण्यात येणार आहेत.

---Advertisement---

शैक्षणिक पात्रता
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त मंडळाकडून 10वी परीक्षा किंवा त्याच्या समकक्ष (10+2 परीक्षा प्रणाली अंतर्गत) किमान 50% गुणांसह शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. नॅशनल कौन्सिलने जारी केलेल्या अधिसूचित ट्रेडमध्ये राष्ट्रीय व्यापार प्रमाणपत्र (ITI) असणे आवश्यक आहे.नॅशनल कौन्सिल फॉर व्होकेशनल ट्रेनिंग/स्टेट कौन्सिल फॉर व्होकेशनल ट्रेनिंग द्वारे जारी केलेले व्यावसायिक प्रशिक्षण किंवा तात्पुरते प्रमाणपत्र.
तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

वय श्रेणी
पदांसाठी वयोमर्यादा 15 ते 24 वर्षे आहे.

भरती शुल्क :

खुल्या प्रवर्गासाठी – 100/- रुपये
SC/ST/PWD/महिलांसाठी – शुल्क नाही.

निवड प्रक्रिया
पदांसाठी उमेदवारांची निवड गुणवत्ता यादीच्या आधारे केली जाईल. उमेदवाराने मॅट्रिक आणि आयटीआयमध्ये मिळवलेल्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल.

अर्ज कसा करायचा
इच्छुक उमेदवारांना अधिकृत वेबसाइट nfr.indianrailways.gov.in ला भेट द्यावी लागेल. यानंतर, ‘जनरल इन्फो’ विभागात गेल्यानंतर, ‘रेल्वे रिक्रूटमेंट सेल’च्या टॅबवर क्लिक करा. आता तुम्हाला अर्जाच्या लिंकवर जाऊन तपशील भरा आणि कागदपत्रे अपलोड करा आणि अर्ज सबमिट करा. खाली दिलेल्या लिंकवरून भरतीची सूचना पहा.

नोटिफिकेशन (Notification) डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---