---Advertisement---
नोकरी संधी

परीक्षेविना थेट भरती ; उत्तर मध्य रेल्वेत अप्रेंटिस पदांच्या १६६४ जागा

train
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ जुलै २०२१ । भारतीय रेल्वे अप्रेंटिस करण्याची इच्छा असणाऱ्या दहावी पास उमेदवारांना चांगली संधी आहे.  उत्तर पूर्व रेल्वेमध्ये १६६४ पदांवर अप्रेंटिससाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. नॉर्थ सेंट्रल रेल्वेच्या वेबसाईटवर उमेदवारांना अर्ज दाखल करता येणार आहेत. २ ऑगस्ट ते १ सप्टेंबर दरम्यान अर्ज दाखल करता येणार आहे.

train

अप्रेंटिस भरतीद्वारे निवड झालेल्या उमेदवारांना अप्रेंटिस कायदा 1961अंतर्गत भारतीय रेल्वेच्या विविध विभागात, कार्यशाळा आणि एनसीआर न्यायक्षेत्रातील म्हणजेच प्रयागराज, आग्रास झांशी वर्कशॉपमध्ये अप्रेंटिस करता येणार आहे.

---Advertisement---

शैक्षणिक पात्रता :

अप्रेंटिस पदासाठी अर्ज करणारा उमेदवार दहावी उत्तीर्ण आवश्यक असून त्याशिवाय संबंधित ट्रेड मधील आयटीआय सर्टिफिकेट त्याच्याकडे असणे आवश्यक आहे. वेल्डर, वायरमन, कारपेंटर या अभ्यासक्रमातील आयटीआय उत्तीर्ण आवश्यक आहे.

वयोमर्यादा : ०१ सप्टेंबर २०२१ रोजी १५ वर्षे ते २४ वर्षे  [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

परीक्षा शुल्क : खुल्या आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी १००/- रुपये [SC/ST/PWD/ महिला – शुल्क नाही]

उमेदवारांची निवड कशा प्रकारे होईल?

उमेदवारांची निवड ही प्राप्त झालेल्या अर्जातून गुणवत्ता यादी तयार करुन करण्यात येणार आहे. उमेदवारांना दहावीला मिळालेले गुण आणि आयटीआय मध्ये मिळालेले गुण याच्याद्वारे गुणवत्ता यादी तयार करून निवड होईल. उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाणार नाही. या पदासाठी कोणतीही लेखी परीक्षा होणार नाही.

अर्ज कसा करायचा?

स्टेप 1: नॉर्थ सेंट्रल रेल्वेच्या वेबसाईटला भेट द्या

स्टेप 2: होमपेजवरील अप्रेंटिस भरती 2021 लिकंवर क्लिक करा

स्टेप 3 : मोबाईल नंबर आणि ईमेल द्वारे लॉगीन करा

स्टेप 4 : लॉगीन केल्यानंतर सर्व आवश्यक माहिती भरून कागदपत्रे अपलोड करा

स्टेप 5 : अर्ज दाखल केल्यानंतर त्याची प्रिंट आऊट काढून ठेवा

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---