जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । 10वी उत्तीर्ण असलेल्या तरुणांसाठी महाराष्ट्र शासनाच्या सरकारी नोकरीची उत्तम संधी चालून आलीय. महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागात शिपाई पदांसाठी मोठी पदभरती निघाली आहे. या भरतीची जाहिरात संबधीत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलीय. Nondani Mudrank Vibhag Bharti 2025

जाहिरातीत नमूद केलेप्रमाणे शैक्षणिक अर्हता व इतर बाबींची पुर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवारांनी www.igrmaharashtra.gov.in या नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य पुणे यांचे संकेतस्थळावर उपलब्ध असलेली सविस्तर जाहिरात वाचून त्याप्रमाणे विहित मुदतीत अर्ज सादर करावेत. IGR Maharashtra Bharti 2025
या भरतीद्वारे एकूण 284 जागा भरल्या जाणार आहे. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया आज म्हणजेच 22 एप्रिल 2025 पासून सुरु होणार आहे. तर उमेदवारांना 10 मे 2025 पर्यंत अर्ज करता येणार आहे. लक्ष्यात असू ऑनलाईन भरलेल्या अर्जाव्यतिरिक्त इतर कोणत्याही प्रकारे भरलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत. IGR Maharashtra Recruitment 2025
पदाचे नाव : शिपाई
शैक्षणिक अर्हता :
उमेदवार हा किमान माध्यमिक शालांत परीक्षा (दहावी उत्तीर्ण) उत्तीर्ण असावा.
वयाची अट: अर्ज करण्याच्या दिनांकास 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
वेतनश्रेणी :
या भरतीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा रु.15000/- ते 47,600/- अधिक नियमानुसार अनुज्ञेय भत्ते.
जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा
परीक्षा शुल्क
खुल्या प्रवर्गाच्या उमदेवारांसाठी रु 1000/-
मागास प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी रु 900/-
अनाथ उमेदवारांसाठी रु 900/-
माजी सैनिक/दिव्यांग माजी सैनीक यांचेसाठी परीक्षा शुल्क माफ राहील.
फक्त ऑनलाईन पध्दतीनेच परीक्षा शुल्क स्विकारले जाईल.
Jalgaon
Hello
Sir mai 8th pass hu lag sakta hu kya