---Advertisement---
भुसावळ

‘नॉन इंटरलॉकिंग’मुळे भुसावळ विभागातून धावणाऱ्या या गाड्यांवर होणार परिमाण

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ नोव्हेंबर २०२३ । दिवाळी सण आता अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपला आहे. या दरम्यान, अनेक जण कुटुंबियांसह दिवाळी साजरी करण्यासाठी घरी गावी जातात. यामुळे रेल्वेत मोठ्या प्रमाणत गर्दी होते. मात्र ऐन सणासुदीच्या काळात रेल्वेने मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील दौंड आणि मनमाड विभागातील विसापूर व बेलवंडी स्थानकादरम्यान दुहेरीकरण सुरू आहे. त्याअंतर्गत होत असलेल्या नॉन इंटरलॉकिंग कामासाठी ट्रैफिक आणि पॉवर ब्लॉक केला जात असल्यामुळे भुसावळ विभागातून जाणाऱ्या काही रेल्वे गाड्यांना उशीर होणार आहे, तर काही गाड्यांचे मार्ग बदलले आहेत.

train 1 jpg webp

मार्ग बदललेल्या गाड्या ११०७८ झेलम एक्स्प्रेस ही ७ नोव्हेंबर रोजी सुटणारी गाडी मनमाड इगतपुरी – कल्याण – पनवेल कर्जत-लोणावळामार्गे गेली. १२१०४ लखनौ-पुणे एक्स्प्रेस ही ८ रोजी सुटणारी गाडी मनमाड – इगतपुरी कल्याण पनवेल कर्जत – लोणावळामार्गे वळविली जाईल. १२७८० हजरत निजामुद्दीन – वास्को दि गामा गोवा एक्स्प्रेस ही ८ रोजी सुटणारी गाडी मनमाड – इगतपुरी – कल्याण पनवेल | कर्जत लोणावळामार्गे वळविली जाईल. २२६८५ यशवंतपूर चंडीगढ एक्स्प्रेस ही ८ रोजी सुटणारी गाडी पुणे – लोणावळा पनवेल कल्याण- इगतपुरी- मनमाडमार्गे वळविली जाईल.

---Advertisement---

बदललेले वेळापत्रक
०१९२१ पुणे – वीरांगना लक्ष्मीबाई झांसी ही ९ रोजी सुटणारी विशेष गाडी दुपारी ३:१५ ऐवजी ४:१५ वाजता सुटेल. ११०३७ पुणे गोरखपूर एक्स्प्रेस ही ९ रोजी सुटणारी गाडी दुपारी ४:१५ ऐवजी ५:१५ वाजता सुटेल.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---