⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | जळगाव जिल्हा | काहीही झालं की त्यांना नाथाभाऊच दिसतात, असं म्हणत एकनाथ खडसेंची शासनावर जोरदार टीका

काहीही झालं की त्यांना नाथाभाऊच दिसतात, असं म्हणत एकनाथ खडसेंची शासनावर जोरदार टीका

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज। ३१ जुलै २०२३। सरकार तुमचे असताना, तीन मंत्री तुमचे असताना आयुक्तांवर अविश्वास दाखल करणे कितपत योग्य आहे? असा प्रश्न खडसेंनी शासनाला केला आहे. आयुक्तांची कामागिरी समाधानकारक आहे, असे नाही. परंतु, यावर शासनाने आपली भूमिका स्पष्ट करावी असे देखील ते म्हणाले. भिडेंनी केलेल्या वक्तव्यावर शासनाने आपली भूमिका स्पष्ट करण्याची आवश्यकता आहे, असा टोला खडसेंनी शासनाला लगावला आहे.

महापुरुषांच्या झालेल्या अपमानावर शासनाची भूमिका काय? असा प्रश्न उपस्थित करत ते बोलते होते. संभाजी भिडे यांनी कायद्याचा भंग केला, या मागे कोण आहे? एवढं धारिष्ट्य ते का करतात? असे अनेक प्रश्न खडसेंनी उपस्थित केले. दारू टपरीटपरीवर मिळतेय, नशेली पदार्थ सर्वत्र मिळत आहे,महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचे प्रमाण, मुलींची पळून जाण्याची वाढलेली संख्या, वाढते कुपोषणाचे बळी या सर्व गोष्टींबाबत शासनावर जोरदार टिका एकनाथ खडसे यांनी केली आहे. “निव्वळ विरोधकांना दाबण्यासाठी किंवा त्रास देण्यासाठी प्रशासन आणि पोलीस यांचा उपयोग होत असेल, तर हे योग्य नाही” असा टोला देखील त्यांनी शासनाला लगावला आहे.

कोणत्याही घटनेच्या पाठीमागे नाथाभाऊच आहेत असं त्यांना वाटतं, असं म्हणत खडसेंनी गिरीश महाजन आणि मंगेश चव्हाण यांच्यावर पलटवार केला आहे. बोलताना सोबतच राज्यात घडणाऱ्या अशांततेच्या घटना आणि वाढणारी गुन्हेगारी याबाबतीत शासनावर प्रश्न चिन्ह उभे करत जोरदार टीका केली. “निव्वळ विरोधकांना दाबण्यासाठी किंवा त्रास देण्यासाठी प्रशासन आणि पोलीस यांचा उपयोग होत असेल, तर हे योग्य नाही” असा टोला देखील त्यांनी शासनाला लगावला आहे

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.