⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | यावल | निंबादेवी धरणावर जाण्याचा प्लॅन करताय? आधी वाचा ही बातमी, अन्यथा होईल गैरसोय

निंबादेवी धरणावर जाण्याचा प्लॅन करताय? आधी वाचा ही बातमी, अन्यथा होईल गैरसोय

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ जुलै २०२२ । तुम्ही जर सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या निंबादेवी धरणावर (Nimbadevi Dam) जाण्याचा प्लॅन करत असाल तर ही बातमी अगोदर वाचा. अन्यथा तुम्हाला गैरसोयीचा त्रास भोगावा लागेल. कारण निंबादेवी धरण हे प्रशासनाकडून प्रतिबंधीत क्षेत्र घोषीत करण्यात आले आहे. या धरणावर रविवारी मोठी गर्दी झाली होती. यानंतर प्रशासनावर टिकेची झोड उठली होती. सध्या पाऊस सुरू असल्याने सतर्कता म्हणून धरण परीसरात पर्यटकांना प्रवेश बंद करीत पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

यावल (Yawal) तालुक्यातील चुंचाळेजवळ निंबादेवी धरण असून सध्या हे धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने सांडव्यावरून वाहणारे पाणी व निसर्गरम्य परीसराचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणावर येत होते शिवाय वाहत्या पाण्यात अंघोळीसाठी रविवारी येथे प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. सातपुड्याच्या वनक्षेत्रात पाऊस सुरू असल्याने या धरणात मोठ्या प्रमाणावर पाणी साचून सांडव्याद्वारे प्रचंड मोठ्या वेगात पाणी वाहत असल्याने कुठलीही दुर्घटना घडू नये यासाठी दक्षता म्हणून प्रशासनाच्या वतीने धरण क्षेत्र हे प्रतिबंधात्मक क्षेत्र जाहीर करण्यात आले. या संदर्भातील बैठक सोमवारी येथील तहसील कार्यालयात घेण्यात आली.

यांची बैठकीला उपस्थिती
या बैठकीत तहसीलदार महेश पवार, पोलिस निरीक्षक दिलीप भागवत, प्रादेशिक वनविभाग पश्चिमचे वनक्षेत्रपाल उपस्थित होते. या बैठकीत दक्षता म्हणून निर्णय घेण्यात आला व यावल पोलिसांच्या वतीने धरण परीसरात चोख पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.