⁠ 
मंगळवार, डिसेंबर 3, 2024
Home | जळगाव जिल्हा | निसर्गकवी, प्रगतिशील शेतकरी ना.धो.महानोर यांचे निधन, उद्या गावी अंत्यविधी

निसर्गकवी, प्रगतिशील शेतकरी ना.धो.महानोर यांचे निधन, उद्या गावी अंत्यविधी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज | ३ ऑगस्ट २०२३ | महाराष्ट्राचे निसर्गकवी, प्रगतिशील शेतकरी म्हणून ओळख असलेले जेष्ठ कवी ना.धो.महानोर (वय ८१) यांनी दीर्घ आजाराने गुरुवारी सकाळी ८.३० वाजता रुबी हॉस्पिटल पुणे येथे अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसापासून त्यांच्यावर पुण्यात उपचार सुरू होते. ना.धो.महानोर यांच्यावर उद्या दि.४ रोजी पळासखेडे येथील त्यांच्या गावी सायंकाळी अंत्यविधी केला जाणार आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले, सूना, नातवंडे, पणतू असा परिवार आहे.

ना. धो.महानोर यांच्या रूपाने एका प्रतिभाशाली आणि आपल्या शब्दांनी समृद्ध करणारा कवी आणि भूमिपुत्र हरपला याचे अतीव दुःख आहे. आमच्या परिवाराचे जेष्ठ सदस्य असलेल्या महानोरदादांना आदरपूर्वक भावपूर्ण श्रद्धांजली, अशा शब्दात जैन परिवारातर्फे अशोक जैन यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.