जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । तुम्हीही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेडमध्ये तब्बल 500 जागांसाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलीय. विशेष या भरती प्रक्रियेला आज 17 डिसेंबर 2024 पासून सुरुवात झाली आहे. इच्छुक उमेदवार 1 जानेवारी 2025 पर्यंत newindia.co.in वर भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.

पदाचे नाव : असिस्टंट या पदासाठी भरती होणार आहे.
शैक्षणीक पात्रता काय?
या भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार कोणत्याही विषयात पदवीधर असावा. आणि उमेदवाराला तो ज्या राज्यासाठी अर्ज करत आहे त्या राज्याच्या प्रादेशिक भाषेचे ज्ञान असले पाहिजे.
वयोमर्यादा – 21 वर्षे ते 30 वर्षे. ST/SC प्रवर्गातील तरुणांना कमाल वयोमर्यादेत 5 वर्षे आणि OBC प्रवर्गातील तरुणांना 3 वर्षांची सूट मिळेल.
परीक्षा फी :
सामान्य/ओबीसी : 850/-
SC / ST / PwBD / EXS : 100/- (inclusive of GST)
पगार : Rs.22405-1305(1)-23710-1425(2)-26560-1605(5)-34585-1855(2)-38295-2260(3)-45075-2345(2)-49765-2500(5)-62265
निवड :
प्राथमिक, मुख्य परीक्षा आणि प्रादेशिक भाषा परीक्षेतील कामगिरीच्या आधारावर उमेदवारांची निवड केली जाईल. प्राथमिक परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मुख्य परीक्षेसाठी बोलावले जाईल. मुख्य परीक्षेत पात्र ठरलेल्या शॉर्टलिस्टेड उमेदवारांनाही प्रादेशिक भाषेच्या परीक्षेला बसावे लागेल.
पूर्व परीक्षेचे स्वरूप :
1 तासाची 100 गुणांची ऑनलाइन वस्तुनिष्ठ परीक्षा असेल. पेपरमध्ये तीन विभाग असतील – इंग्रजी (30 गुण, 30 प्रश्न), तर्क (35 प्रश्न, 35 प्रश्न), संख्यात्मक क्षमता – 35 प्रश्न, 35 गुण.
जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा