⁠ 
शनिवार, डिसेंबर 14, 2024
Home | नोकरी संधी | न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनीत जम्बो भरती! पदवीधरांना मिळेल 88 हजारापर्यंत पगार

न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनीत जम्बो भरती! पदवीधरांना मिळेल 88 हजारापर्यंत पगार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात आहात का? तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनीकडून विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली जात आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी त्वरित अर्ज करावा. या भरतीसाठी कंपनीच्या अधिकृत वेबसाइट www.newindia.co.in वर १० सप्टेंबरपासून अर्ज भरण्यास सुरुवात होत आहे.अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने करावा लागणार आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख २९ सप्टेंबर २०२४ आहे.

कोणती पदे भरली जाणार?
1) प्रशासकीय अधिकारी (Accounts) 50
2) प्रशासकीय अधिकारी (Generalists) 120

शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी/पदव्युत्तर पदवी [SC/ST/PWD: 55% गुण]
पद क्र.2: CA/ICAI/ICWAI + 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी/पदव्युत्तर पदवी किंवा 60% गुणांसह MBA Finance/PGDM (Finance)/M.Com [SC/ST/PWD: 55% गुण]

वयाची अट: 01 सप्टेंबर 2024 रोजी 21 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज शुल्क : General/OBC: ₹850/- [SC/ST/PWD: ₹100/-]
पगार : निवड झाल्यास ८८ हजार पगार देण्यात येणार आहे.

अशी होईल निवड?
निवड प्रक्रिया पूर्व, मुख्य आणि मुलाखत अशी तीन टप्प्यांमध्ये होणार आहे. पुर्व परीक्षा १३ ऑक्टोबर २०२४ रोजी होईल आणि मुख्य १७ नोव्हेंबर २०१४ रोजी घेण्यात येईल. ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे. पूर्व परीक्षेत १०० गुणांचे वस्तुनिष्ठ प्रश्न विचारले (Job News) जातील. यामध्ये इंग्रजी, रिझनिंग, क्वालिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि जनरल अवेअरनेस या विषयांवर प्रश्न असतील. तर पेपर II वर्णनात्मक स्वरूपाचा असेल.

जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.