जळगाव लाईव्ह न्यूज । डिसेंबर महिना सुरू होण्यास आता काही दिवसच उरले आहेत. यांनतर १ डिसेंबरपासून पैशांसंबंधित अनेक नियमांमध्ये बदल होणार आहेत. ज्यांचा थेट परिणाम तुमच्या खिशावरही होऊ शकतो.

दर महिन्याच्या पहिल्या तारखेला अनेक नियमात बदल केले जातात. त्यानुसार १ डिसेंबरपासून काही नियमात बदल होणार आहेत. ते बदल नेमके कोणते आहेत ते जाणून घेऊया..

एटीएफच्या दरात बदल
ऑइल मार्केटिंग कंपन्या ATF (Aviation Turbine Fuel) मध्येही बदल करणार आहेत. १ डिसेंबरपासून एटीएफच्या किंमती बदलणार आहे. या किंमती वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

यूनिफाइड पेन्शन स्कीम निवडण्याची शेवटची तारीख
सरकारी कर्मचाऱ्यांना यूनिफाइड पेन्शन स्कीम निवडण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर निश्चित करण्यात आली आहे. याआधी शेवटची तारीख ३० सप्टेंबर होती. आता दोन महिन्याची मुदत वाढवून देण्यात आली आहे. १ डिसेंबरनंतर तुम्हाला यूपीएस निवडण्याची परवानगी नाहीये.
एलपीजी गॅसच्या किंमती
१ डिसेंबरपासून एलपीजी गॅसच्या किंमतीत बदल होणार आहे. दर महिन्याच्या १ तारखेला एलपीजी गॅसचे नवे दर अपडेट होतात. डिसेंबरमध्येही गॅस दरात बदल होणार आहे.
पेन्शनधारकांसाठी नियम
पेन्शनधाकांना दरवर्षी लाइफ सर्टिफिकेट जमा करावे लागते. यावर्षी ३० नोव्हेंबरपर्यंत तुम्ही लाइफ सर्टिफिकेट जमा करु शकतात. जर तुम्ही हे काम केले नाही तर तुम्हाला पेन्शन मिळणार नाही.


