⁠ 
शुक्रवार, ऑक्टोबर 18, 2024
Home | वाणिज्य | आता वेटिंग तिकिटावर प्रवाश केल्यास बसेल मोठा दंड; रेल्वेच्या नव्या नियमाची अंमलबजावणी सुरु

आता वेटिंग तिकिटावर प्रवाश केल्यास बसेल मोठा दंड; रेल्वेच्या नव्या नियमाची अंमलबजावणी सुरु

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ जुलै २०२४ । भारतीय रेल्वेने नवा नियम आणला आहे. आता वेटिंग तिकीट काउंटरवरून खरेदी केले तरी त्याचा उपयोग होणार नाही. रेल्वेने आरक्षित डब्यातून वेटींग तिकिटावर प्रवास करण्यास पूर्णपणे निर्बंध आणले आहे. म्हणजेच तुमचे वेटींग तिकीट असल्यास एसी किंवा स्लीपर कोचमधून तुम्ही प्रवास करु शकत नाही. १ जुलै पासून या निर्णयाचा अंमलबजावणी सुरु आहे.

खरंतर भारतीय रेल्वेतून रोज कोट्यवधी प्रवाशी प्रवास करतात. परंतु प्रवास करताना हजारो जणांचे तिकीट कन्फर्म होत नाही. ऑनलाईन केलेले तिकीट प्रतिक्षा यादीवर असल्यास रद्द होते. परंतु काऊंटरवर काढलेले तिकीट रद्द होत नसल्यामुळे अनेक जण वेटींग तिकिटावर रेल्वेतून प्रवास करतात. आता वेटींग तिकिटावर रेल्वेतून प्रवास करण्यासंदर्भात १ जुलैपासून मोठे बदल करण्यात आले आहे.

जुलै महिन्यापूर्वी वेटींग तिकिटावर प्रवास करणारे प्रवाशी प्रवास करु शकत होते. परंतु आता वेटींग तिकिटावर आरक्षित डब्यातून प्रवास केल्यास दंड लागणार आहे. तसेच टीटी रेल्वेतून उतरवूनसुद्धा देणार आहे. रेल्वेचा हा नियम इंग्रजांच्या काळापासून आहे. परंतु त्याची अंमलबजावणी आता कठोरपणे सुरु झाली आहे. यामुळे ऑफलाईन तिकीट काढले असले तरी ते रद्द करुन पैसे परत घ्यावे, असे रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.

इतका बसेल दंड :
रेल्वेने आपल्या आदेशात म्हटले आहे की, वेटींग तिकिटावर आरक्षित डब्यातून प्रवास केल्यास 440 रुपये दंड लागणार आहे. दंड भरुन प्रवाशांची सुटका होणार नाही. त्यांना त्या आरक्षित डब्यातून प्रवास करता येणार नाही. टीटी दंड वसूल केल्यानंतर वेटींगवर असणाऱ्या प्रवाशांना त्या डब्यातून उतरवून देणार आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.