⁠ 
बुधवार, जानेवारी 8, 2025
Home | राष्ट्रीय | चालू आठवड्यात ‘हे’ 7 नवीन IPO उघडणार; गुंतवणूकदारांना कमाईची संधी..

चालू आठवड्यात ‘हे’ 7 नवीन IPO उघडणार; गुंतवणूकदारांना कमाईची संधी..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ०६ जानेवारी २०२५ । सगळ्यात जलद मार्गाने पैसे कमविण्यासाठी अनेक जण शेअर बाजार (Share Market) निवडतात. त्यातच IPO मधूनही अनेक जण पैसे कमवितात. जर तुम्हीही यापैकी असाल तर तुमच्यासाठी ही बातमी आहे. या चालू आठवड्यात 7 नवीन आयपीओ उघडणार आहे. ज्यामुळे गुंतवणूकदारांना मोठ्या प्रमाणात कमाईच्या संधी मिळण्याची शक्यता आहे. New IPO Coming

यामध्ये तीन आयपीओ मेनबोर्ड विभागातील आहेत. तर इतर एसएमई विभागातील आहेत. तसेच नवीन आठवड्यात आधीच उघडलेल्या 3 आयपीओमध्ये पैसे गुंतवण्याची संधी असेल. याशिवाय सहा शेअर्सचे लिस्टिंग हाेणार आहे. चला जाणून घेऊया या आठवड्यात नेमके कोणते नवीन IPO उघडणार आहेत ते..

हे आयपीओ उघडणार :
कॅपिटल इन्फ्रा ट्रस्ट इनव्हिट आयपीओ (Capital Infra Trust InvIT)
इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट कॅपिटल इन्फ्रा ट्रस्टचा 1578 कोटी रुपयांचा आयपीओ 7 जानेवारी रोजी उघडणार आहे. तर 9 जानेवारी रोजी बंद होणार आहे. आयपीओ बंद झाल्यानंतर 14 जानेवारीपासून बीएसई आणि एनएसईवर युनिट्समध्ये ट्रेडिंग सुरू होईल. किंमत बँड 99-100 रुपये प्रति युनिट आणि लॉट आकार 150 युनिट्स आहे.

स्टँडर्ड ग्लास लाइनिंग टेक्नॉलॉजी आयपीओ (Standard Glass Lining Technology IPO)
हा आयपीओ 6 जानेवारी रोजी उघडणार आहे. कंपनीला आयपीओमधून 410.05 कोटी रुपये उभे करायचे आहेत. आयपीओसाठी किंमत बँड 133-140 रुपये प्रति शेअर आहे आणि लॉट आकार 107 शेअर्सचा आहे. आयपीओ 8 जानेवारी रोजी बंद होणार आहे. एनएसई आणि बीएसईवर 13 जानेवारीला शेअर्सचे लिस्टिंग होईल.

बी.आर.गोयल इन्फ्रास्ट्रक्चर आयपीओ (B.R.Goyal Infrastructure IPO)
हा 85.21 कोटी रुपयांचा आयपीओ 7 जानेवारी रोजी उघडेल आणि 9 जानेवारी रोजी बंद होईल. किंमत बँड 128-135 रुपये प्रति शेअर आहे. तर लॉट आकार 1000 शेअर्स आहे. बीएसई एसएमईवर 14 जानेवारी रोजी शेअर्सचे लिस्टिंग होईल.

इंडोबेल इन्सुलेशन आयपीओ (Indobell Insulation IPO)
हा 10.14 कोटी रुपयांचा आयपीओ 6 जानेवारीला उघडेल आणि 8 जानेवारीला बंद होईल. कंपनीचे शेअर्स 13 जानेवारी रोजी बीएसई एसएमईवर सूचीबद्ध केले जातील. किंमत बँड 46 रुपये प्रति शेअर आहे. तर लॉट आकार 3000 शेअर्स आहे.

अवाक्स अॅपरल्स अँड ऑर्नामेंट्स आयपीओ (Avax Apparels And Ornaments IPO)
हा 1.92 कोटी रुपयांचा आयपीओ 7 जानेवारीला उघडणार आहे. यामध्ये तुम्ही 9 जानेवारीपर्यंत 70 रुपये प्रति शेअर आणि लॉट 2000 शेअर्समध्ये बोली लावू शकता. शेअर्स 14 जानेवारी रोजी बीएसई एसएमईवर सूचीबद्ध होणार आहेत.

डेल्टा ऑटोकॉर्प आयपीओ (Delta Autocorp IPO)
कंपनीचा 54.60 कोटी रुपयांचा आयपीओ 7 जानेवारीला उघडेल आणि 9 जानेवारीला बंद होईल. शेअर्स 14 जानेवारी रोजी एनएसई एसएमईवर सूचीबद्ध केले जातील. किंमत स बँड 123-130 रुपये प्रति शेअर आहे. तर लॉट आकार 1000 शेअर्सचा आहे.

क्वाड्रंट फ्यूचर टेक आयपीओ (Quadrant Future Tek IPO)
आयपीओ 7 जानेवारीला उघडेल आणि 9 जानेवारीला बंद होईल. कंपनीला आयपीओतून 290 कोटी रुपये उभे करायचे आहेत. किंमत बँड 275-290 रुपये प्रति शेअर आणि लॉट आकार 50 शेअर्स आहे. शेअर्स 14 जानेवारी रोजी बीएसई आणि एनएसईवर सूचीबद्ध केले जातील.

या कंपन्या हाेणार सूचीबद्ध
इंडो फार्म इक्विपमेंट आयपीओ 7 जानेवारी रोजी बीएसई आणि एनएसईवर सूचीबद्ध होईल. तर टेक्नीकेम ऑर्गेनिक्स त्याच दिवशी बीएसई एसएमईवर सूचीबद्ध होईल. लिओ ड्राय फ्रूट्स आणि स्पाइसेसचे शेअर्स 8 जानेवारी रोजी बीएसई एसएमईवर सूचीबद्ध केले जातील. डेव्हिन सन्स आणि परमेश्वर मेटलचे शेअर्स 9 जानेवारी रोजी बीएसई एसएमईवर सूचिबद्ध होतील. तर फॅबटेक टेक्नॉलॉजीज 10 जानेवारी रोजी बीएसई एसएमईवर सूचीबद्ध होईल.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.