⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

मारुळ येथे ३१२ कुटुंबांना नवीन घरगुती वीज कनेक्शन

जळगाव लाईव्ह न्यूज । अमीर पटेल । मारुळ (ता.यावल) येथे महाराष्ट्र राज्य सरकारने आर्थिक दुर्बल घटकांसाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजनेंतर्गत महाराष्ट्र राज्य महावितरण विज मंडळाच्या मार्फत अनुसूचित जाती व जमातीच्या प्रवर्गातील ३१२ कुटुंबांना नवीन घरगुती वीज कनेक्शन देण्यात आले.

दरम्यान, कार्यक्रमाच्या प्रसंगी मारुळ नगरीचे सरपंच असद अहमद, जावेद अली सय्यद यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले. सद्य:स्थितीला निसर्गाच्या लहरीपणामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना संजीवनी देणारी महाराष्ट्र शासनाची “शेतकरी कृषी योजना” ही वरदान ठरत असून या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेती वीज पंपावरील विज बिला मध्ये सप्टेंबर २०२० पासून ३१ मार्च २०२२ पर्यंतच्या शेती पंपावरील एकूण बिलांमध्ये ५०% शेती वीज बिले शेतकऱ्यांना माफ करण्यात येत आहे. सदर योजनेचा शेतकऱ्यांना फार मोठा फायदा मिळत असल्यामुळे शेतकरी वर्गाकडून या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे फैजपूर विभागाचे उपकार्यकारी अभियंता आर.टी.फिरके यांनी सांगितले.गावातील नागरिकांनी नवीन घरगुती वीज कनेक्शन मागणी केल्या नुसार गावात प्रत्यक्षात फिरून पाहणी करून आवश्यकतेनुसार ठिक ठिकाणी नवीन १८ विद्युत पोल उभे करून व नवीन घरगुती वीज कनेक्शन देण्यात आले. व एक नवीन ट्रांसफार्मर बसविण्यात आला असून, बुद्ध नगरी भागामध्ये नवीन अठरा विद्युत पोल वरिष्ठ कार्यालयाकडे मंजुरी कामे प्रस्तावित आहे. गावातील नागरिकांच्या किरकोळ स्वरूपाच्या बारा तक्रारींचा जागेवरच निपटारा केल्याचे न्हावी झोनचे सहाय्यक अभियंता धनंजय चौधरी यांनी यावेळी माहिती दिली.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच असद सय्यद, प्रमुख पाहुणे पोलीस पाटील नरेश मासोळे, फैजपूर विभागाचे उपकार्यकारी अभियंता आर.टी.फिरके सहाय्यक अभियंता एच.एन.पाटील,धनंजय चौधरी,हैदर अली सय्यद आदी उपस्थित होते.