जळगाव लाईव्ह न्यूज । ०६ मे २०२१ । जळगाव शहरातील ईच्छादेवी चौकाजवळ मार्चमध्ये सायंकाळी साहित्या यांच्या घरी दरोडा टाकण्याचा प्रयत्न झाला होता. एलसीबीच्या पथकाने गुन्ह्याचा छडा लावला असून मोठ्या रकमेच्या लालसेपोटीच पुतण्याने मित्रांच्या साहाय्याने दरोड्याचा प्रयत्न केला असल्याचे उघड झाले आहे. पथकाने ५ आरोपींच्या मुसक्या आवळल्या असल्याची माहिती एलसीबीचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी दिली.
दि.१७ मार्च रोजी संध्याकाळी ७.२५ वाजेच्या दरम्यान चार अनोळखी इसम तोंडाला रुमाल बांधलेले वय अंदाजे ३०-३५ वर्षे असलेले त्यातील एकाच्या अंगात काळ्या रंगाचे शर्ट, निळ्या रंगाची पॅन्ट, मध्यम बांधा, रंग गोरा, दुसरा इसम त्याच्या अंगात चॉकलेटी रंगाचे फुल बायांचे शर्ट, निळ्या रंगाची जिन्स पॅन्ट, मध्यम बांधा उजव्या हाताला रुमाल बांधलेला रंग गोरा, तिसरा इसम याने राखाडी रंगाचे फुल बाहंयाचे शर्ट, मध्यम बांधा व चौथ्या इसमाने पोपटी रंगाचे दि शर्ट व खाकी रंगाची पॅन्ट घातलेली यांनी फिर्यादी वंशिका प्रकाश साहित्या वय ३५ रा. प्लॅट नं. १ पहीला मजला, स्वामी टॉवर, ईच्छा देवी चौक, सेवा मंडल समोर जळगाव यांच्या उघडया घरात जबरीने प्रवेश करुन त्यांच्या जवळील चाकु व पिस्तलचा धाक दाखवुन घरातील सोने व पैसे दया असे म्हणुन घरातील कपाट फिर्यादी कडुन उघडुन घेवुनः तपासणी केली व नंतर काही मिळुन न आल्याने फिर्यादी यांचे घराच्या दरवाज्याला बाहेरुन कडी लावुन निघुन गेले होते त्या अनुषंगाने जिल्हापेठ पोलीस स्टेशन भाग ५ गुरन. ९४/२०२१ भादवि क. ३९३, गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा घडल्यानंतर जळगाव शहरातील व्यापारी वर्गात भिती निर्माण झाली होती सदर गुन्हयांचे गांभिर्य ओळखुन या बाबत पोलीस अधीक्षक डॉ.प्रविण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी गुन्हयाचे घटना स्थळावर तात्काळ भेट देवून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना सुचना व मार्गदर्शन केले होते. त्याअनुषंगाने पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि स्वप्निल नाईक, स.फौ. अशोक महाजन, विजय पाटील, विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, जितेंद्र पाटील, सुनिल दामोदरे, नरेंद्र वारुळे, राहुल पाटील, नितीन बाविस्कर, प्रितम पाटील, दिनेश बडगुजर संदीप साळवे, प्रदीप पाटील, जयंत चौधरी, भगवान पाटील, नंदलाल पाटील, किरण धनगर, प्रमोद लाडवंजारी मुरलीधर बारी, दर्शन ढाकणे इत्यादीचे पथक रवाना केले होते.
एलसीबीने लावला गुन्ह्याचा छडा
पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना गोपनिय माहिती मिळाली की, या दरोडयामध्ये फिर्यादीचा नातेवाईक सनी साहीत्या याचा सहभाग आहे. त्या अनुषंगाने वरील पथकाने गुन्हया घडल्यापासून अथक परिश्रम घेवुन गुन्हया संदर्भात माहिती संकलीत केली त्या माहितीच्या आधारे त्यांचे मित्र परिवाराची कसून गोपनिय माहिती काढण्यात आली असता त्यात असे निष्पन्न झाले की, सनी साहीत्या याला आपले काकाचे घरात नेहमी ३० ते ४० लाख रुपये असतात त्यात आपल्याला चांगले पैसे मिळतील त्या उद्देशांने त्यांचे साथीदार यांची मदत घेण्याचे ठरविले. पैसे कसे लुटायाचे त्याबाबत सर्व नियोजन केले. त्यात घराची व घराकडे जाणारे येणारे सर्व रस्त्यांची इत्यभुत माहिती तयार केली व त्या नुसार दि.१७ मार्च रोजी सांयकाळी ७.२५ वाजेच्या दरम्यान वरील आरोपीतांनी स्कॉपीओ गाडीत येवुन पिस्तोलचा धाक दाखवुन उघडया घरात जबरीने प्रवेश करुन त्यांच्या जवळील चाकु व पिस्तलचा धाक दाखवुन घरातील सोने व पैसे दया असे म्हणुन घरातील कपाट फिर्यादीकडुन उघडुन घेवुन तपासणी केली व नंतर काही मिळुन न आल्याने फिर्यादी यांचे घराच्या दरवाज्याला बाहेरुन कडी लावुन निघुन गेले होते.
५ जणांना केली अटक
पोलिसांनी या गुन्हयात आरोपी सनी इंदरकुमार साहीत्या वय २५ रा. स्वामी टॉवर, ईच्छा देवी चौक, सेवा मंडल समोर जळगाव ( मुख्य सुत्रधार ), राकेश शिवाजी सोनवणे वय – ३५ रा.देवपुर धुळे, उमेश सुरेश बारी वय – २५ रा.चर्च च्या मागे जळगाव, मयुर अशोक सोनार वय ३५ रा.जळगाव, नरेंद्र उर्फ योगेश अशोक सोनार वय ३४ रा.जामनेर यांचा समावेश आहे. सदर सर्व आरोपींचे गुन्हेगारी पार्श्वभुमी असुन त्याचेवर यापुर्वी गुन्हे दाखल आहेत सदर आरोपीतांना पैश्याची चणचण असल्यामुळे त्यांनी झटपट पैसे मिळविण्यासाठी सनी साहीत्या याचे सोबत कट रचुन सदरचा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले आहे.