नेहरू युवा केंद्रातर्फे उद्या रन फॉर युनिटी – एकता दौडचे आयोजन

ऑक्टोबर 30, 2022 1:34 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० ऑक्टोबर २०२२ । भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालया अंतर्गत असलेल्या नेहरू युवा केंद्र जळगांव द्वारा सरदार लोहपुरुष वल्लभभाई पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरी करण्यात येत असुन यानिमित्ताने रन फॉर युनिटी – एकता दौडचे आयोजन करण्यात आले आहे.

run for unity jpg webp

नेहरू युवा केंद्रातर्फे जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील राष्ट्रीय युवा स्वयंसेवकांच्या माध्यमातून व ग्रामप्रशासन, स्थानिक युवा मंडळाच्या सहकार्याने उद्या दि.३१ रोजी सकाळी ७ ते ९ दरम्यान रन फॉर युनिटी – एकता दौडचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात युवक – युवतींनी, सामाजिक व शैक्षणिक संस्थेच्या पदाधिकारी, नेहरू युवा मंडळाचे पदाधिकारी व सदस्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी नरेंद्र डागर यांनी केले आहे.

चेतन वाणी

पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now