जळगाव लाईव्ह न्यूज । ७ जुलै २०२३ । महाराष्ट्रात गेल्या वर्षी झालेल्या सत्तांतरापासून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाला एकामागून एक धक्के बसत आहे. अशातच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला (Shiv Sena) आणखी एक धक्का बसला आहे. तो म्हणजे विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) हे एकनाथ शिंदे यांच्या गटात दाखल झाल्या आहेत.
त्यांनी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी केलेली कामांमुळे देशाचा विकास झाला आहे. मोदी यांनी राम मंदिराची उभारणी, कलम ३०७ कलम हे प्रश्न सोडवले. महिलांचा प्रश्न आणि देशाचा विकास हा मुख्य उद्देश ठेऊन मी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे.
सुषमा अंधारे यांचे महत्व उद्धव ठाकरे यांच्या गटात वाढल्यामुळे आपण नाराज झाल्या का? या प्रश्नावर त्यांनी नकार दिला. माझी भूमिका विकासाची आहे आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्याच्या विकास होत आहे. त्यामुळेच मी त्यांच्यसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.