---Advertisement---
वाणिज्य बातम्या

भारतीय शेअर बाजारात हाहाकार! कोरोना महामारीनंतर सर्वात मोठी घसरण

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ एप्रिल २०२५ । अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बेमुळे जागतिक बाजारपेठेत खळबळ उडाली असून, त्याचा थेट परिणाम भारतीय शेअर बाजारावर झाला आहे. आज सोमवारी भारतीय शेअर बाजार उघडताच हाहाकार उडाला. सेन्सेक्स ३९०० अंकांनी कोसळला तर निफ्टी १२०० अंकांनी घसरला. यामुळे लाखो कोटी रूपये स्वाह झाले आहेत.कोरोना महामारीनंतर भारतीय शेअर बाजारात सर्वात मोठी घसरण नोंदवली गेली आहे.

share market jpg webp

डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलेली नवीन टॅरिफधोरणांमुळे आयात-निर्यातीवर परिणाम होण्याची भीती आहे, ज्यामुळे अनेक कंपन्यांचे शेअर्स घसरले. विशेषतः बँकिंग, ऑटोमोबाईल आणि आयटी क्षेत्रातील शेअर्सवर मोठा दबाव दिसून आला.

---Advertisement---

गुंतवणूकदारांमध्ये अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले असून, बाजारातील चढ-उतारांचा अंदाज बांधणे कठीण झाले आहे. तज्ज्ञांच्या मते, ही घसरण तात्पुरती असू शकते, परंतु जर जागतिक आर्थिक परिस्थिती आणखी बिकट झाली तर बाजाराला सावरायला वेळ लागू शकतो. या परिस्थितीत गुंतवणूकदारांना संयम ठेवण्याचा आणि घाबरून निर्णय न घेण्याचा सल्ला दिला जात आहे. शेअर बाजारातील हा हाहाकार लवकर थांबेल, अशी आशा सर्वांना आहे.

कोरोना महामारीनंतर भारतीय शेअर बाजारात सर्वात मोठी घसरण नोंदवली गेली आहे. सोमवारी बाजार उघडताच गुंतवणूकदारांमध्ये प्रचंड घबराट पसरली आणि त्याचा परिणाम शेअर बाजारावर स्पष्टपणे दिसून आला. ही घसरण फक्त भारतामध्येच नाही तर आशियाई बाजारपेठेत दिसून आली. आशियाई शेअरबाजारात सरासरी ९ टक्क्यांनी घसरण पाहायला मिळाली. हाँगकाँग, चीनसह सर्वच शेअर शेअर बाजारात कोट्यवधि रूपयांची राखरांगोळी झाली.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---

Leave a Comment