---Advertisement---
महाराष्ट्र राजकारण

मुख्यमंत्री शिंदेंचा राष्ट्रवादीला आणखी एक धक्का? माजी खासदाराच्या राजीनाम्याने खळबळ

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ जुलै २०२२ । राज्यात शिंदे गटात सामील होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या वेगळ्या भूमिकेमुळे आधीच शिवसेनेला (Shivsena)मोठा धक्का बसला. यात आता राष्ट्रवादी काँग्रेसलाही (NCP) एक मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष तथा माजी खासदार सुरेश जाधव (Suresh Jadhav) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबई येथील भेट घेतल्यानंतर राष्ट्रवादीच्या उपाध्यक्ष पदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्याकडे दिला आहे. आपण वैयक्तिक कारणामुळे राजीनामा देत असल्याचे त्यांनी सांगितले असून आता ते एकनाथ शिंदे गटामध्ये सामील होण्याची शक्यता आहे.

suresh jadhav ncp jpg webp

राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष तथा माजी खासदार सुरेश जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबई येथे भेट घेतली होती. या भेटीदरम्यान ते शिंदे गटात सामील होणार का? अशा चर्चेला उधाण आलं असताना त्यांनी आपल्या उपाध्यक्ष पदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे सोपवला आहे. तर आपण वैयक्तिक कारणामुळे राजीनामा देत असल्याचे जयंत पाटील यांना दिलेल्या पत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे.

---Advertisement---

यासोबतच त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे गंगाखेड, पालम, पूर्णा तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे. पुराचे पाणी शेतातील त्यामुळे शेतजमीन खरडून गेल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना त्वरित मदत करण्याची गरज असल्याचे देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेल्या पत्रामध्ये नमूद करण्यात आली आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---