⁠ 
गुरूवार, नोव्हेंबर 21, 2024
Home | राजकारण | शरद पवार पक्षाचा जाहीरनामा प्रकाशित ; वाचा जाहीरनाम्यातील महत्त्वाच्या घोषणा..

शरद पवार पक्षाचा जाहीरनामा प्रकाशित ; वाचा जाहीरनाम्यातील महत्त्वाच्या घोषणा..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ एप्रिल २०२४ । लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून आज जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला असून या जाहीरनाम्यात काही प्रमुख मुद्द्यांचा समावेश शरद पवार गटाडून करण्यात आला आहे. त्यामध्ये शेतकरी, नागरी विकास, आरोग्य, पर्यावरण, गॅस सिलिंडर, महिला, तरुण, तसेच कामगार यांच्यासह जातनिहाय जनगणना यांसह शाळांचा सेफ्टी ऑडिट यांच्यासह अनेक मुद्द्यांचा समावेश करण्यात आला आहे.

या कार्यक्रमाला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी खासदार वंदना चव्हाण, युवक प्रदेशाध्यक्ष मेहमबूब शेख, महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे,पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप या कार्यक्रमाला उपस्थित होते. जयंत पाटील यांनी शपथनाम्यात कोणत्या गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे या संदर्भातील माहिती दिली आहे.

दरम्यान, महिलांसाठी शासकीय नोकऱ्यांमध्ये ५० टक्के आरक्षणाचा मुद्दा जाहीरनाम्यात समाविष्ट करण्यात आला आहे. “देशभरात ३० लाखाच्या आसपास रिक्त जागा आहेत. आम्ही सत्तेत गेल्यानंतर त्या भरण्याचा आग्रह करू. महिलांचं शासकीय नोकरीतलं आरक्षण ५० टक्के ठेवण्याचा आग्रह केला जाईल. जीएसटी देशातल्या लोकांना लुबाडण्याचं काम करतोय. त्याला मानवी चेहरा देण्याचं काम आवश्यक आहे. जीएसटीच्या बाबतीत केंद्र सरकारचा हस्तक्षेप मर्यादित केला जाईल”, अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली.

जाहीरनाम्यातील महत्त्वाच्या घोषणा
स्वयंपाकाच्या गॅसच्या किमती करुन 500 रुपयांवर आणणार
-पेट्रोल आणि डिझेलवरील कराची फेररचना, महागाई रोखण्यासाठी प्रयत्न

  • केंद्राकडील 30 लाख रिक्त जागांवर भरती करण्याचा आग्रह
    -महिलांना शासकीय नोकऱ्यात 50 टक्के आरक्षण
    -जीएसटीला मानवी चेहरा देण्याचा प्रयत्न करणार
  • शेतकऱ्यांच्या शेतमालाला किमान आधारभूत किंमत देणार
  • शासकीय सेवेतील कंत्राटी कामगार पद्धत बंद करणार
    -जातनिहाय जनगणना करण्यासाठी आग्रह करणार

-आरक्षणावरील 50 टक्केची मर्यादा हटवण्यासाठी प्रयत्न करणार

  • खाजगी कॉलेजमध्ये आरक्षण ठेवण्याचं काम करणार
  • जेष्ठ नागरिकांसाठी आयोगाची स्थापना करणार
  • आरोग्यासाठी अर्थसंकल्पीय तरतूद करणार
  • शिक्षणासाठी अर्थसंकल्पीय तरतूद 6 टक्क्यांपर्यंत करणार
  • शेती आणि शैक्षणिक वस्तूंवर शून्य टक्के जीएसटी आणणार
  • खाजगीकरणावर मर्यादा आणणार
  • अग्निवीर योजना आम्ही बंद करणार
  • वन नेशन आणि वन इलेक्शन चर्चा करणे आता योग्य नाही, आधी आहेत त्या इलेक्शन यंत्रणा सक्षम करू
  • प्रत्येक गरीब महिलेला वार्षिक 1 लाख देऊ
  • अंगणवाडी कर्मचाऱ्यांची संख्या वाढवू
author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.