जळगाव जिल्हाजळगाव शहर

राष्ट्रवादीतर्फे शरद पवारांच्या वाढदिवसाचे नियोजन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ डिसेंबर २०२१ । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगाव महानगरतर्फे विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बैठकीच्या प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला महापरिनिर्वाण दिनानिमित्त पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आले.

दरम्यान, वाढदिवसानिमित्त दि. १२ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगाव महानगरतर्फे 100 गरजू व विधवा महिलांना साड्या वाटप, फुटपाथवरील 100 निराधार गोरगरीबांना ब्लँकेट वाटप, 500 होतकरू विद्यार्थ्यांना वह्या वाटप, 50 होतकरू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप, शहरात विविध ठिकाणी शाखांचे उदघाटन, शाखांचे नियोजन, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सद्स्यता नोंदणी अभियान, आरोग्य शिबिर, नेत्र तपासणी शिबिर, वृक्षारोपण अभियान, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे फळवाटप आदि समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येणार आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा कार्यालयात सकाळी 10 वाजुन 10 मिनिटांनी केक कापुन आणि 11 ते 2 यावेळेत स्क्रिनवर शरद पवार व पक्षातील विविध नेते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील. अशा प्रकारे शरद पवार यांचा वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे .

बैठकीत जिल्हाध्यक्ष रविंद्र भैय्या पाटिल, महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी, प्रदेश सरचिटणीस नामदेवराव चौधरी, प्रदेश प्रवक्ते योगेश देसले, महिला महानगर अध्यक्ष मंगला पाटिल, वाल्मिक पाटील, अश्विनी देशमुख, वाय एस महाजन, अशोक पाटिल, मजहर पठाण, अरविंद मानकरी, प्रतिभा शिरसाठ, अमोल कोल्हे, डॉ. रिजवान खाटिक, किरण राजपूत, रमेश बाऱ्हे, दिलीप माहेश्वरी, सुशील शिंदे, जितेंद्र बागरे, सुदाम पाटिल,विशाल देशमुख, नईम खाटिक, अकिल पटेल, जितेंद्र चांगरे, मनीषा चव्हाण, राहुल टोके, जयेश पाटिल, रहीम तडवी, दिपीका भामरे व पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button