---Advertisement---
जळगाव जिल्हा राजकारण

मोठी बातमी ; राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे अचानक दिल्लीला रवाना, भाजपमध्ये प्रवेश करणार?

eknath khadse
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १ एप्रिल २०२४ । लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून मात्र याच दरम्यान राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहे. अशातच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आमदार एकनाथ खडसे हे रविवारी रात्री अचानक दिल्लीला रवाना झाले आहे. एकनाथ खडसे भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याने ते तातडीने दिल्ली रवाना झाल्याच्या जळगाव जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रात उलट सुलट चर्चा रंगल्या आहेत

eknath khadse

मात्र या संदर्भात स्वतः एकनाथ खडसे यांच्याशी फोनवर चर्चा करण्यात आली. शरद पवार यांच्या सोबत बैठक आहे. त्याच बरोबर सुप्रीम कोर्टात देखील काम असल्याने आपण दिल्ली निघालो असल्याची एकनाथ खडसे यांनी फोनद्वारे चर्चा केली आहे. भाजपामध्ये जाणार असल्यास आपल्याला नक्की कळविनार असल्याचं ही खडसे यांनी म्हटल आहे.

---Advertisement---

दरम्यान, मागील काही दिवसापासून एकनाथ खडसे भाजपमध्ये घरवापसी करणार असल्याची चर्चा सुरु आहे. मात्र यापूर्वीही खडसेंनी आपण शरद पवारांच्या राष्ट्रवादीतच राहणार असल्याचं सांगितले. तसेच एकनाथ खडसे रावेर लोकसभा मतदारसंघातुन निवणूक लढविणार असल्याचीही चर्चा होती. मात्र खुद्द खडसेंनी आपण लोकसभा निवडणूक लढविणार नसल्याचं स्पष्ट केलं होते.मात्र अचानक खडसे दिल्लीला रवाना झाल्याने जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रात उलट सुलट चर्चा रंगल्या आहेत

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---