जळगाव लाईव्ह न्यूज । १० ऑक्टोबर २०२२ । सध्याच्या घडीला राज्यात एकच विषय चर्चेला आहे. तो म्हणजेच केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठवल्याच्या निणर्यावरून. यावर अनेकांनी नेते मंडळींनी प्रतिक्रिया दिल्या. दरम्यान, जळगावातील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात आज सोमवारी बैठक पार पडली. या बैठकीनंतर राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे पुन्हा भाष्य केलं आहे.
बाळासाहेब ठाकरे यांनी मोठ्या मेहनतीने शिवसेना राज्यात उभी केली, त्यांच्याच मेहनतीमुळे धनुष्यबाणाला एक वेगळी प्रतिष्ठाही संपूर्ण महाराष्ट्रात निर्माण झाली. वर्षानुवर्ष बाळासाहेब ठाकरे यांची जी पुण्याई होती त्या शिवसेनेचे दोघांच्या भांडणामुळे दोन तुकडे झाले असून शिवसेना ही दुभंगली गेली आहे असे म्हणले.
तसेच पक्षप्रमुख म्हणून चुका होत राहतात काही चुका या उद्धव ठाकरे यांच्याकडूनही झाल्या असतील. मात्र एखादी चूक एवढी मोठी नसावी की, ज्यामुळे पक्ष संपवून टाकावा. आता तेही संपले आणि तुम्ही संपले, अशी स्थिती निर्माण होता कामा नये. आता न्यायालयाच्या निर्णयाकडे आपण सर्वजण आशेने पाहतो आहे. मात्र न्यायालय सुद्धा काही वेगळा निर्णय देईल, असे वाटत नाही असेही मत एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले.