---Advertisement---
राजकारण जळगाव शहर

जळगावच्या रस्त्यांवरून डीपीडीसीत राष्ट्रवादी-भाजपचे एकमत

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ नोव्हेंबर २०२२ । जळगाव शहरातील रस्त्यांची गेल्या काही वर्षापासून प्रचंड दुरवस्था झालेली आहे. शहरातील रस्त्यांच्या कामासाठी निधी आला तरी कामे होत नसल्याचे चित्र आहे. सोमवारी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत रस्त्यांच्या मुद्द्यावरून चांगलेच घमासान झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे आ.एकनाथराव खडसे आणि भाजप आ.सुरेश भोळे दोघांनी रस्त्यांच्या परिस्थितीवरून प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले.

Jalgaon Roads

जळगाव शहरातील रस्त्यांची परिस्थिती लक्षात घेता नागरिक आणि लोकप्रतिनिधी सर्वच प्रशासनापुढे हतबल झाले आहे. राजकारण्यांनी अनेकदा प्रश्न उचलून देखील पक्षांतर्गत वैयक्तिक मतभेदमुळे रस्ते होऊ होऊ शकले नसल्याचा आरोप वारंवार होतो. आजच्या परिस्थितीत रस्ते कधी होणार याचे उत्तर कुणीच देऊ शकत नाही.

---Advertisement---

सोमवारी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. याप्रसंगी व्यासपीठावर मंत्री गिरीश महाजन देखील उपस्थित होते. जळगाव शहरातील रस्त्यांच्या मुद्द्यावरून आमदार एकनाथराव खडसे यांनी प्रश्न मांडला. इच्छादेवी चौफुली ते डी मार्ट हा रस्ता कुणाच्या मालकीचा आहे आणि त्याचे काम कधी सुरू होणार अशी विचारणा त्यांनी केली. जळगाव मनपा, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग या तिन्ही विभागांनी रस्ता आमच्या मालकीचा नसल्याचे उत्तर दिले आहे, त्यामुळे या रस्त्याचे काम होणार की नाही अशी विचारणा आ.खडसे यांनी केली.

खडसेंच्या प्रश्नाला जोड देत जळगाव शहराचे आ.सुरेश भोळे यांनी देखील प्रशासनाला जाब विचारला. शहरातील रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी प्राप्त झाला होता त्यापैकी ४ कोटींचा निधी अद्यापही अखर्चित असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच रस्ता कुणाच्या मालकीचा, कोण काम करत नाही या सर्वांमध्ये जळगावची बदनामी होत आहे. जळगाव मनपाकडे शहरातील खड्डे बुजवण्यासाठी देखील पैसे नाहीत का? असा प्रश्न आ.भोळे यांनी विचारला.

जळगाव मनपा आयुक्त डॉ.विद्या गायकवाड यांनी यावर उत्तर दिले मात्र मंत्री गिरीश महाजन यांनी त्यावर असंतोष दर्शविला. पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी देखील प्रशासनाच्या कामावर संताप व्यक्त केला. जळगाव शहरातील रस्त्यांच्या विषयावर राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचे एकमत पहावयास मिळाले.

*पहा व्हिडियो प्रेक्षपण :*
https://www.facebook.com/JalgaonLiveNews/videos/1469327123592408

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---