जळगाव लाईव्ह न्यूज । २६ एप्रिल २०२२ । अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (ravi rana) या दाम्पत्यास आणखी एक झटका बसला आहे. तो म्हणजे त्यांच्या जामीन अर्जावर तातडीने सुनावणी करण्यास मुंबईतील सत्र न्यायालयाने नकार दिला. येत्या 29 तारखेला खार पोलिसांनी दाम्पत्यांच्या आरोपावर सविस्तर निवेदन सादर करण्याचे आदेश देत सत्र न्यायालयाने पुढील सुनावणी 29 एप्रिल रोजी ठेवली आहे. त्यामुळे राणा दाम्पत्यांना येत्या 29 एप्रिलपर्यंत कोठडीत राहावं लागणार आहे. येत्या 29 एप्रिल रोजी राणा दाम्पत्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार असल्याने त्यांना जामीन मिळतो का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
या अर्जावर सुनावणी सुरू असताना राणा दाम्पत्याचे वकील अॅड रिझवान मर्चंट यांनी जामीन देण्याची मागणी केली. तर विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी जामीनाला विरोध केला. आधी मॅजिस्ट्रेट कोर्टातून अर्ज मागे घ्यावा नंतर सुनावणी करावी अशी मागणी सरकारी वकिलांनी केली.
दरम्यान, खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या जामीन अर्जावर काल सोमवारी (25 एप्रिल) मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने एफआयआर रद्द करण्याची याचिका फेटाळून लावली आहे. दोन वेगळ्या घटना असल्यामुळे गुन्हे दाखल होणे आवश्यक आहे. मात्र दुस-या एफआयआरमध्ये कारवाईपूर्वी आरोपींना 72 तास आधी नोटीस देणं आवश्यक आहे, असा निर्णय कोर्टाने दिला आहे. तर 353 गुन्ह्यात राणा दाम्पत्यांना दिलासा मिळाला आहे. एफआयआरमध्ये कारवाईपूर्वी आरोपींना 72 तास आधी नोटीस देणं गरजेचं आहे.