जळगाव जिल्हा

राष्ट्रीय क्रीडा दिन जळगावात उत्साहात साजरा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्युज | २९ ऑगस्ट २०२१ । राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलावर हॉकी जळगाव व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने स्पोर्ट्स हाऊस जळगाव व हॉकी महाराष्ट्र यांच्यातर्फेखेळाडूंचा सत्कार करण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानी महापौर जयश्री महाजन होत्या. व्यासपीठावर जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित, पोलीस निरीक्षक विलास शेंडे, उप कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रफिक तडवी,हॉकी जळगाव चे सचिव फारुक शेख, सहसचिव प्राध्यापक डॉक्टर अनिता कोल्हे, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त अंजली पाटील, आयशा साजिद ,कांचन चौधरी व स्पोर्ट्स हाऊस चे अडव्होकेट आमीर शेख यांची उपस्थिती होती.  

यावेळी जळगाव शहराच्या महापौर जयश्री महाजन म्हणाल्या कि, राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त माझ्या शुभ हस्ते जळगावातील राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय व ओलंपियन खेळाडूंचा सत्कार करण्यात आला आज मी खरोखरच धन्य झाली की माझ्यासारख्या एका शिक्षकाच्या हस्ते महान खेळाडूचा सत्कार झाला त्यामुळे माझे दोन्ही हात पवित्र होऊन ते सोन्यासारखे झाल्याचा भास मला होत आहे

सर्वप्रथम मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेला महापौर यांच्या हस्ते संपन्न झाले राष्ट्रीय खेळाडू शादाब सय्यद यांनी मेजर ध्यानचंद यांची माहिती विषद केली. जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित यांनी राष्ट्रीय क्रीडा दिनाचे महत्त्व विषद केले. पोलीस निरीक्षक विलास शेंडे यांनी क्रीडा व करिअर याबाबत मार्गदर्शन करून आपले उदाहरण स्पष्ट केले. शिवछत्रपती अवॉरडी अंजली पाटील ,यांनी सुद्धा आपल्या मनोगतात द्वारे खेळाडूंना मार्गदर्शन केले.

या राष्ट्रीय खेळाडूंचा झाला सत्कार

प्यारा ओलंपिक खेळाडू व तालुका क्रीडा अधिकारी मार्ग धर्माई,(बॅडमिंटन)आंतरराष्ट्रीय खेळाडू अयशा साजिद (कॅरम) कांचन चौधरी( जलतरण) राष्ट्रीय खेळाडू भाग्यश्री पाटील ,सानिया तडवी व तहसीन तडवी (सर्वबुद्धिबळ) धनंजय धनगर व सुरज सपके (फुटबॉल) योगेश घोंगडे, सय्यद मोहसीन( कॅरम) शशांक अत्तरदे ,जगदीश झोपे, रिषभ कारवा, तनेश जैन, नचिकेत ठाकूर, निरज जोशी व आशुतोष मालुंजकर( सर्व क्रिकेट) सायली खंडागळे ,वर्षा सोनवणे, कोमल सोनवणे , नूतन शेवाळे,जुबेर कुरेशी , तौसिफ कुरेशी (सर्व हॉकी)लियाकत अली सय्यद ,अरविंद खांडेकर व मुजफ्फर शेख ( हॉकीप्रशिक्षक) यांचे महापौर जयश्री महाजन यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक फारुक शेख यांनी तर आभार तालुका क्रीडा अधिकारी सौ सुजाता गुल्हाने यांनी केले. कार्यक्रमास जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील अधिकारी एम के पाटील, सुजाता गुल्हाने ,अरविंद खांडेकर ,मार्ग धर्मइ ,गोविंद सोनवणे ,विनोद कुलकर्णी, विनोद माने ,सेंटर रेल्वेचे अकील शेख, भुसावळ चे शोएब खान, मजाज खान,आमिर खान(मिली), जुबेर खान, इम्रान बिस्मिल्लाह, शारीक सैयद,मुख्तार पिंजारी आदींची उपस्थिती होती

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button