जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना खुशखबर आहे. नॅशनल सीड्स कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये १२ वी पास ते पदव्युतर उमेदवारांसाठी मोठी पदभरती सुरूय. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अजिबात वेळ वाया न घालवता या अर्ज करावीत. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारला जाणार आहे. या भरतीसाठी 08 डिसेंबर 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे. नॅशनल सीड्स कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये १८८ पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. National Seeds Corporation Limited
रिक्त पदाचा तपशील :
1) डेप्युटी जनरल मॅनेजर (Vigilance) 01
2) असिस्टंट मॅनेजर (Vigilance) 01
3) मॅनेजमेंट ट्रेनी (HR) 02
4) मॅनेजमेंट ट्रेनी (Quality Control) 02
5) मॅनेजमेंट ट्रेनी (Elect. Engg.) 01
6) सिनियर ट्रेनी (Vigilance) 02
7) ट्रेनी (Agriculture) 49
8) ट्रेनी (Quality Control) 11
9) ट्रेनी (Marketing) 33
10) ट्रेनी (Human Resources) 16
11) ट्रेनी (Stenographer) 15
12) ट्रेनी (Accounts) 08
13) ट्रेनी (Agriculture Stores) 19
14) ट्रेनी (Engineering Stores) 07
15) ट्रेनी (Technician) 21
शैक्षणिक पात्रता :
या पदासाठी उमेदवाराकडे एमबीए एचआर किंवा एलएलबी पदवी असणे गरजेचे आहे. याचसोबत १० वर्षांचा अनुभव असायला हवा. असिस्टंट मॅनेज विजिलेंस पदासाठी दोन वर्षांचा अनुभव असायला हवा. मॅनेजमेंट ट्रेनी पदासाठी एचआर पदासाठी दोन वर्षांचा अनुभव असायला हवा. तसेच १२ वी पास/ ITI / डिप्लोमा / बी.कॉम / ग्रॅज्युएट / बीई /बीटेक / बीएससी / एमबीए/ पोस्ट ग्रॅज्युएट पदवीधर उमेदवारदेखील अर्ज करु शकतात. (National Seeds Corporation Limited Recruitment)
ट्रेनी, सिनियर ट्रेनी, मॅनेजमेंट ट्रेनी या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्यादा २७ वर्ष असावी. असिस्टंट मॅनेजर पदासाठी ३० वर्ष वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. डेप्युटी जनरल मॅनेजर पदासाठी ५० वर्ष वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
नॅशनल सीड्स कॉर्पोरेशन लिमिडेटमध्ये कॉम्प्युटर बेस्ड टेस्टद्वारे भरती होणार आहे. त्यानंतर कागदपत्रे पडताळणी केली जाणार आहे. यानंतर मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे. या नोकरीसाठी निवड झाल्यावर उमेदवारांना २४,६१६ ते १,४१,२६० रुपये पगार मिळणार आहे.
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
Apply Online