जळगावात दुचाकी चोरीचे रॅकेट उध्वस्त; १० दुचाकी जप्त, नशिराबादचा सराईत चोरटा जेरबंद..

मार्च 18, 2026 12:47 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरात एकीकडे दुचाकी चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत असल्याचं दिसत असताना स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कामगिरी बजावली आहे. सराईत चोरट्याला अटक करत पोलिसांनी ३ लाख १० हजार रुपये किमतीच्या एकूण १० मोटारसायकली जप्त केल्या असून, या कारवाईत आंतरराज्य स्तरावरचे चोरीचे जाळे उघडकीस आले आहे.

duchakichor

नशिराबाद येथील २० वर्षीय समीर शेख याला पोलिसांनी सापळा रचून अटक केली. सुरुवातीला दिशाभूल करणारी उत्तरे देणाऱ्या आरोपीने पोलिसांच्या चौकशीत अखेर गुन्ह्यांची कबुली दिली. त्याने जळगाव शहरासह एमआयडीसी, जिल्हापेठ आणि मध्य प्रदेशातील बुरहानपूर येथूनही दुचाकी चोरी केल्याचे उघड झाले.

या कारवाईत ३ लाख १० हजार रुपये किमतीच्या विविध कंपन्यांच्या १० मोटारसायकली पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. या प्रकरणामुळे केवळ स्थानिकच नव्हे, तर आंतरराज्य पातळीवर कार्यरत असलेल्या चोरीच्या रॅकेटचा पर्दाफाश झाला असून, आरोपीकडून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.दरम्यान, आरोपीला पुढील चौकशीसाठी शनिपेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.

यांनी केली कारवाई

पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, डीवायएसपी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, विजय पाटील, अक्रम शेख, नितीन बाविस्कर, किशोर पाटील, रवींद्र कापडणे, राहुल रगडे, छगन तायडे, अजय पाटील आणि प्रवीण हिवराळे यांच्या पथकाने ही कामगिरी केली. या प्रकरणाचा पुढील तपास शनिपेठ पोलीस ठाण्याचे प्रदीप नन्नवरे करत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now