⁠ 
सोमवार, मे 27, 2024

सूर्यग्रहणाबद्दल नासाचा मोठा इशारा ; ग्रहणाच्या काळात फोटो, व्हिडीओ काढत असाल तर..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ एप्रिल २०२४ । यंदाच्या वर्षातील पहिले सूर्यग्रहण 8 एप्रिल 2024 रोजी चैत्र अमावस्येला होणार असून तब्बल 5 तास 25 मिनिटे हे ग्रहण असणार आहे. या सूर्यग्रहणात काही वेळ दिवसा पूर्णपणे काळोखा होणार असून या सूर्यग्रहणाबद्दल लोकांमध्ये उत्साह हा बघायला मिळतोय. सोशल मीडियावरही या सूर्यग्रहणाबद्दल लोकांमध्ये क्रेझ बघायला मिळतंय. मात्र यातच सूर्यग्रहणाच्या पार्श्वभूमीवर नासाकडून मोठा इशारा देण्यात आला आहे.

विशेष म्हणजे हा इशारा मोबाईल वापरणाऱ्यांसाठी आहे. आपण नेहमीच ऐकतो की, सूर्यग्रहण कधीच थेट डोळ्यांनी बघितले नाही पाहिजे. यामुळे डोळ्यांचे मोठे नुकसान देखील होऊ शकते. आता थेट नासानेच मोठा इशारा दिला आहे.

अनेकजण ग्रहणाच्या काळात मोबाईलवरून विविध फोटो व्हिडीओ काढतात. मात्र, आता याचबद्दलचा इशारा नासाकडून देण्यात आलाय. जर तुम्ही सूर्यग्रहणाचे फोटो किंवा व्हिडीओ मोबाईलच्या कॅमेऱ्याने काढत असाल तर तुमचा मोबाईल खराब होऊ शकतो. हो तुम्ही खरे ऐकले. तुमचा मोबाईल खराब होऊ शकतो.

एका पोस्टवर कमेंट करत नासाने लिहिले की, जर तुम्ही सूर्यग्रहणाचा फोटो मोबाईलने घेत असाल तर तुमच्या कॅमेऱ्याचे सेंसर खराब होऊ शकतो. म्हणजेच काय तर सूर्यग्रहणाचे फोटो मोबाईलमध्ये काढणे तुम्हाला चांगलेच महागात पडू शकते. यासोबतच सूर्यग्रहण पाहण्यासाठी लोक मोठ्या प्रमाणात घराच्या बाहेर पडतात.

8 एप्रिल 2024 ला उत्तर अमेरिकेमध्ये सूर्यग्रहण दिसणार आहे. हेच नाही तर दिवसा काही मिनिटे पूर्णपणे अंधार होणार आहे. यामुळेच खबरदारी म्हणून अनेक भागातील शाळांना सुट्टी दिल्याचे देखील समजते. आता उत्तर अमेरिकेतील या सूर्यग्रहणाकडे संपूर्ण जगाच्या नजरा लागल्याचे बघायला मिळत आहे.