जळगाव लाईव्ह न्युज | २७ ऑगस्ट २०२१ | सध्याच्या काळात पैशांची बचत करणे हे खूपच गरजेचं आहे. बचत केलेल्या पैशांची योग्य पद्धतीने गुंतवणूक करणं तितकंच आवश्यक आहे. योग्य बचत तुम्हाला करोडपती बनण्यास मदत करू शकते. सध्या म्युच्युअल फंडमधी एसआयपी (SIP) च्या माध्यमातून लोक मोठ्या गुंतवणूक करत आहेत. जर तुम्हालाही तुमच्या बचतीची रक्कम वाढवायची असेल तर एसआयपीमध्ये जरूर गुंतवणूक करा.

म्युच्युअल फंड SIP च्या माध्यमातून तुम्ही तुमचं करोडपती बनण्याचं स्वप्न पूर्ण करू शकता. यासाठी केवळ तुम्हाला दिवसाला 50 रुपयांची बचत करावी लागेल. या बचतीमुळे तुम्ही निवृत्तीपर्यंत करोडपती बनू शकता. जेवढ्या लवकर तुम्ही गुंतवणूक सुरू कराल तेवढा तुम्हाला याचा अधिक फायदा मिळेल.
तुम्ही वयाच्या 25 व्या वर्षापासून दररोज 50 रुपयांची बचत केली आणि ते पैसे म्युच्युअल फंड एसआयपीमध्ये गुंतवले तर तुम्हाला निवृत्तीपर्यंत अर्थात वयाच्या साठाव्या वर्षापर्यंत मोठी रक्कम मिळेल. तुम्ही करोडपती बनण्याचं स्वप्न पूर्ण करू शकता. अर्थात 35 वर्षांकरता तुम्हाला दररोज 50 रुपयांची बचत करायची आहे.
ही रक्कम दरमहा 1500 रुपये होईल. योग्य म्युच्युअल फंड निवडून तुम्हाला सरासरी 12-15 टक्क्यांचा रिटर्न मिळेल. तुम्ही 35 वर्षात साधारण 6.3 लाखांची दीर्घकालीन गुंतवणूक केली आणि 12.5 टक्क्यांचा रिटर्न तुम्हाला मिळाला तर हे मुल्य 1.1 कोटी रुपये होईल. दरम्यान याकरता तुम्ही योग्य सल्ल्याने म्युच्युअल फंड निवडणे गरजेचे आहे.
तुम्ही वयाच्या 30व्या वर्षापासून गुंतवणूक करण्यास सुरुवात केली तर गुंतवणुकीचे 5 वर्ष कमी होतील. त्यामुळे ही उशिरा सुरू केलेली गुंतवणूक तुम्हाला तोट्याची ठरू शकते. तुम्ही दररोज 50 रुपयांची बचत करून म्युच्युअल फंड एसआयपीमध्ये दरमहा साधारण 1500 रुपये गुंतवले, तर वयाच्या 60 व्या वर्षापर्यंत तुमची गुंतवणूक जवळपास 5.4 लाख रुपयांची होई. याची एकूण व्हॅल्यू 59.2 लाख रुपये होईल. एकूण 5 वर्षांचा गुंतवणुकीचा कालावधी कमी झाल्यामुळे तुमचं जवळपास 40 लाखांचं नुकसान होईल.