---Advertisement---
जळगाव जिल्हा गुन्हे

मुक्ताईनगर हादरले! तरुणाची निर्घुण हत्या करून मृतदेह नदीपात्रात फेकला

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ जुलै २०२४ । मुक्ताईनगरमधून हत्येची एक खळबळजनक घटना समोर आलीय. उसवारीने दिलेल्या पैशांसाठी तगादा लावत असलेल्या मित्राची निर्घुण खून करून मृतदेह पूर्णा नदीपात्रात फेकल्याची घटना समोर आलीय. नितीन साहेबराव पाटील (वय २५, रा. कला वसंत नगर, आसोदा रोड, जळगाव) असं मृत तरुणाचे नाव आहे. दरम्यान, या प्रकरणी दोन जणांना ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती समोर येत असून याबाबत मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

muktainagar murder jpg webp

नेमकी काय आहे घटना?
जळगाव शहरातील कला वसंत नगरमध्ये कुटुंबियांसह राहणार नितीन पाटील हा काही दिवसांपूर्वी दिल्ली येथे रेल्वेत अप्रेंटीशीप करून तो जळगावात परतला होता. दरम्यान, नितीनकडून मुक्ताईनगर येथील एका मित्राने त्याच्याकडून १ लाख रुपये उसनवारीने घेतले होते. उसनवारीने घेतलेले पैसे नितीन पाटील हा सारखा त्याच्या मित्राला मागायचा. मात्र नितीन पाटीलचा हा तगादा त्याच्या मित्राला आवडला नाही.

---Advertisement---

त्यामुळे संशयित आरोपी याने गुरुवारी दि. १८ जुलै रोजी नितीन पाटील याला मुक्ताईनगर येथे बोलावून घेतले. “इकडे ये पैसे घेऊन जा आणि एका कार्यक्रमाला जायचे आहे, तिकडे आपण जाऊ” असे सांगून संशयित आरोपीने नितीन पाटीलला बोलावून घेतले. त्यानंतर डोलारखेडा शिवारात नेऊन तेथे काही मित्रांच्या मदतीने त्याचा खून करून मृतदेह हात पाय बांधून पूर्णा नदी पात्रात फेकून दिला.

दरम्यान, नितीनसोबत असणाऱ्या एका युवकाने पोलीस स्थानक गाठून काही जणांनी नितीनला कुंड गावाजवळच्या जंगलात मारून त्याचा मृतदेह पुर्णा नदीच्या पात्रात टाकून दिल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी या प्रकरणी माहिती देणार्‍या तरूणाला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणात अन्य आरोपींचा सहभाग असून त्याचा तपास देखील सुरू आहे.

मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला ही माहिती कळताच त्यांनी आज शुक्रवारी पहाटेपासून पूर्णा नदीपात्रात मृतदेहाचा शोध घ्यायला सुरुवात केली. तब्बल ८ ते १० तासांनी त्यांना मयत नितीन पाटील यांचा मृतदेह हात पाय बांधलेल्या अवस्थेत सापडला.खूनाच्या घटनेमुळे मुक्ताईनगर हादरले असून प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---