---Advertisement---
गुन्हे जळगाव जिल्हा

जळगावात तरुणाचा धारदार शस्त्राने वार करून खून

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज | ७ जून २०२३ | शहरातील खोटेनगरजवळ तीन ते चार जणांनी एका कारवर दगडफेक करून कारमधील अविनाश निंबा अहिरे (३५, रा. कुसूंबा) या तरूणावर धारदार शस्त्राने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना मंगळवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास घडली होती. दरम्यान, घटनेतील जखमीचा बुधवारी सकाळी मृत्यू झाला आहे.

murder raver

मंगळवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास कुसूंबा येथील अविनाश अहिरे हा मित्र राम सुभाष कुकडे याच्यासोबत खोटेनगरजवळ कार एमएच. १९. ईए.०४५१ उभी करून त्यामध्ये बसला होता. अचानक तीन ते चार तरूण त्याठिकाणी आले. त्यांनी जून्या वादातून अहिरे व कुकडे यांना मारहाण करून त्यांच्या कारच्या काचेवर दगडफेक केली.

---Advertisement---

यामध्ये कारचे पुढील काच फुटले. नंतर एकाने अहिरे याच्यावर धारधार शस्त्राने वार केले. यामध्ये अहिरे हा गंभीर जखमी झाला. कुकडे याने लागलीच अहिरे याला तत्काळ जिल्हा रुग्णालयात आणले. गंभीर दुखापत झाल्यामुळे तरुणाची प्रकृती गंभीर झाल्याने त्याला तत्काळ अतिदक्षता विभागात हलविण्यात आले होते. बुधवारी सकाळी उपचार सुरू असताना अहिरे याचा मृत्यू झाला आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---