जळगाव लाईव्ह न्यूज । १६ जुलै २०२१ । मुक्ताईनगर शहरात एका २४ वर्षीय तरुणाचा कुऱ्हाडीने वार करून खून करण्यात आल्याची घटना रात्री घडली. विशाल वामन ठोसरे (अंदाजे वय २४) असे या मयत तरुणाचे नाव असून या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, या खुनामागचे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही.
याबाबत असे की, मुक्ताईनगर येथील रहिवासी विशाल वामन ठोसरे या तरुणाचे नुकतेच लग्न झाले होते. त्याची पत्नी ही बाहेरगावी गेली होती. दरम्यान, रात्री त्याचा कुऱ्हाडीने वार करून हत्या करण्यात आल्याची घटना घडलीय. विशालच्या मेव्हण्यानेच ही हत्या केल्याचा संशय असून संशयित मेहुणा विजय सावकारे घटनास्थळावरून पसार झाला आहेत.
गुरुवारी जावयासाठी पाहुणचार केल्यानंतर विशाल ठोसरे आणि मेहुणा विजय सावकारे वरच्या मजल्यावर झोपायला गेले. रात्री दोघे एकाच खोलीत झोपले. मात्र सकाळी विशालचा मृतदेह आढळून आला तर मेहुणा येथून पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी घटना स्थळी जाऊन पंचनामा करून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू केले आहे. तसेच डि.वाय.एस.पी. विवेक लावंड मुक्ताईनगर यांनी देखील घटनास्थळी भेट दिली. या खुनामागचे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही.