गुन्हेजळगाव शहर

Murder Detection : बहिणीची छेड काढत असल्याने दोघांनी काढला ‘त्या’चा काटा!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ ऑगस्ट २०२२ । जळगाव तालुक्यातील जुना कडगाव रोडवरील शेतात संदेश लिलाधर आढाळे (वय-२२, रा. भादली ता.जि.जळगाव) या तरुणाचा मृतदेह संशयास्पदरित्या आढळून आल्याची घटना १० रोजी उघडकीस आली होती. तरुणाच्या अंगावर जखमा असल्याने त्याचा खून झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. पोलिसांनी आठवडाभरात गुन्ह्याची उकल केली असून गावातील दोन अल्पवयीन तरुणांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. बहिणीची छेडखानी करत असल्याने त्यांनीच संदेशचा काटा काढल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

जळगाव तालुक्यातील भादली ते जूना कडगाव रोडवरील पाटचारीला लागून असलेल्या शेतात संदेश आढाळे (वय-२२ रा.भादली) या तरुणाचा संशास्पदरित्या मृतदेह आढळून आल्याची घटना दि.१० रोजी घडली होती. तरुणाच्या अंगावर अनेक जखमा असल्याने पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर त्याचा खून झाल्याचे उघड झाले होते. याप्रकरणी नशिराबाद पोलिसात संदेशच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. खूनाचा उलगडा करण्यासाठी भुसावळ येथील उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी भादलीत ठाण मांडून होते.

दरम्यान, संदेशचा मित्र कोण?, त्याच्याशी कोणाचे वाद आहे?, काय वाद आहेत? यासह त्याला शेवटचा कॉल कोणाचा होता? याची संपुर्ण माहिती पोलिसांकडून संकलित करण्यात आली होती. तपासात मिळालेला एक-एक धागा जोडत पोलिसांचा तपास सुरू होता.

पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे तपासचक्रे फिरविताच संदेश आढाळे याचा खून गावातीलच दोन अल्पवयीन तरुणांनी केल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्या दोन्ही संशयितांना सोमवारी दि.१५ ऑगस्ट रोजी दुपारी भादली गावातून ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता, संदेश हा त्या तरुणांच्या बहिणीला त्रास देत होता. त्याच कारणावरुन त्या दोघांनी संदेशचा खून केल्याची कबुली त्यांनी दिली.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button