जळगाव लाईव्ह न्यूज । ३ मार्च २०२५ । जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथील प्रसिद्ध रील स्टार विकी पाटील याच्या हत्येमुळे अख्खा राज्य हादरलं होते. या घटनेच्या काही दिवसानंतर एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. ज्यामुळे या मृत्यूचे गुढ उकलंलं आहे. ही हत्या त्याच्याच वडिलांनी केली असून जेसीबी चालकाला सुपारी देऊन केली असल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे.

दारुच्या व्यसनामुळे विक्की आई-वडिलांना शिवीगाळ करुन मारहाण करत असल्याने त्रस्त वडिलांनी जेसीबी चालक रवींद्र पाटील याला मुलाच्या हत्येची सुपारी दिली होती. मुलाची हत्या झाल्यानंतर विक्कीच्या वडिलांनी म्हणजे विठ्ठल पाटील यांनी गळफास लावून आत्महत्या केली. मृत्यूआधी विठ्ठल पाटील यांनी एक चिठ्ठी लिहिली होती. त्यात त्यांनी आपण मुलाची हत्या करुन स्वत: जीवन संपवत असल्याचं लिहिलं होतं.
विठ्ठल पाटील यांनी सुपारी दिल्यानंतर रवींद्र पाटील याने विक्कीला दारु पाजून शेतात नेलं आणि त्यांची गळफास लावून हत्या केली. यानंतर मृतदेह लपवण्यासाठी त्याने जेसीबीच्या साहाय्याने खड्डा खोदला आणि विक्कीचा मृतदेह त्यात पुरला. विक्कीची हत्या झाल्यानंतर त्याच्या वडिलांनी चिठ्ठी लिहिली आणि स्वत: गळफास लावून घेतला.
पोलिसांनी चिठ्ठीच्या आधारे तपास करुन जेसीबी चालकासह विक्कीचे काका आणि चुलत भावाल अटक केली. मात्र, हत्येसाठी किती रक्कमेची सुपारी दिली गेली. याबाबत अद्याप खुलासा झालेला नाही. याआधी विक्कीच्या पत्नीनेही विक्कीची हत्या त्याच्या सासऱ्यांनी नाही तर चुलत सासरे आणि दिराने केल्याचा आरोप केला आहे.