जळगाव जिल्ह्यात कुणाला किती जागा मिळणार? एक्झिट पोल समोर?

डिसेंबर 21, 2025 10:15 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ डिसेंबर २०२५ । राज्यासह जळगाव जिल्ह्यातील १८ नगरपरिषद व नगरपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल आज १० वाजेला लागणार आहे. असून या निवडणुकीचा एक्झिट पोल नुसार जिल्ह्यात भाजप हा निर्विवादपणे क्रमांक एकचा पक्ष राहील असा अंदाज आहे.

loksabha election jpg webp

तर दुसऱ्या क्रमांकावर शिंदेसेना असेल, असा अंदाज वर्तवला जातोय. एक्झिटनुसार महाविकास आघाडीला जिल्ह्यात धक्का बसल्याची दिसून येतेय.

Advertisements

एक्झिट पोलच्या अंदाजानुसार जिल्ह्यात भाजप ९ जागा तर शिवसेना ७, राष्ट्रवादी १ व अपक्ष १ अशा जागा जिंकू शकेल असे म्हटले आहे. मात्र एक्झिट पोलचे हे अंदाज कितपत खरे ठरतात याची उत्सुकता असेल.

Advertisements

जळगावमधील जामनेरमध्ये भाजपने आधीच आघाडी घेतली असून तेथे भाजपचे नेते मंत्री गिरीश महाजन यांची पत्नी साधना महाजन या बिनविरोध निवडून आल्या आहेत. आज सकाळी १० वाजता स्थानिक निवडणूक अधिकारी याबाबत घोषणा करतील.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now