जळगाव लाईव्ह न्युज | चिन्मय जगताप | महानगरपालिकेने केलेल्या फेरमूल्यांकयामुळे ५५ हजार मालमत्तांची वाढ झाली आहे. या अंतर्गत मनपाकडून प्रभाग समिती मधील 40 कॉलनीतील ३० हजार मालमत्ता धारकांना नोटीस बजावण्यात आली आहे. महानगरपालिकेने घेतलेल्या या निर्णयामुळे पालिकेच्या वार्षिक उत्पन्न तब्बल ३० कोटीची वाढ होणार आहे.
मनपाच्या उत्पन्नाचे प्रमुख स्रोत असलेल्या मालमत्ता करात गेल्या दोन-तीन वर्षापासून वाढ होत आहे. यावर्षी अंदाजे ४० कोटीची मालमत्ता कर वसुली करण्यात आली होती. दरवर्षी मनपातर्फे मोठ्या प्रमाणावर वसुली केली जाते. 50 ते 52 कोटीची वसुली करण्याचे विभागाचे लक्ष असते. मात्र आता या घेतल्या निर्णयामुळे मनपाच्या तिजोरीत अजून तीस कोटी रुपये पडू शकतात अशी माहिती संबंधित विभागाने मिळाली आहे.
पंधरा वर्षानंतर प्रश्न अखेर मार्गी
मनपातर्फे घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे मनपाच्या मालमत्ता करात तब्बल तीस कोटींनी वाढ होणार आहे. हा निर्णय मनपाने घ्यावा यासाठी गेल्या 15 वर्षापासून मोठे प्रयत्न केले जात होते. अखेर पंधरा वर्षाच्या प्रतीक्षेनंतर हा निर्णय मार्गी लागला आहे.