जळगाव जिल्हा
प्रवाशांसाठी गुडन्यूज! आजपासून धावणार मुंबई-नागपूर विशेष एक्स्प्रेस, जळगावातही थांबा
जळगाव लाईव्ह न्यूज । 18 फेब्रुवारी 2024 । भुसावळ विभागातील रेल्वे प्रवाशांना दिलासा देणारी एक बातमी आहे.मध्य रेल्वेने प्रवाशांची अतिरिक्त गर्दा लक्षात घेऊन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते नागपूर विशेष शुल्कावर एकेरी विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष या गाडीला जळगावला ही थांबा असल्याने जळगावकरांची सोय झाली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-नागपूर अतिजलद वन वे विशेष गाडी (रेल्वे क्रमांक ०२९०३) मुंबई येथून १९ फेब्रुवारी रोजी रात्री १२.२० वाजता सुटेल आणि नागपूर येथे त्याच दिवशी दुपारी ५.३२ वाजता पोहोचेल, या गाडीला जळगाव रेल्वे स्थानकावर थांबा असून ही गाडी जळगावात सकाळी ७.३३ वाजता पोहोचेल, या गाडीला दादर, ठाणे, कल्याण, नाशिकरोड, मनमाड, जळगाव, भुसावळ स्थानकावर थांबा आहे.