---Advertisement---
जळगाव जिल्हा

मुंबईहून पहिली आस्था ते अयोध्या ट्रेन ‘या’ तारखेपासून धावणार ; रामभक्तांना मिळेल जळगावमध्ये नाश्ता, भोपाळमध्ये जेवण..

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ जानेवारी २०२४ । अयोध्या येथील मंदिरात रामललाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यानंतर प्रभू श्री रामाच्या दर्शनासाठी भारतीय रेल्वे देशातील विविध भागातून रामभक्तांसाठी ‘आस्था स्पेशल’ ट्रेन चालविणार आहे. यामध्ये मुंबईतून १६ गाड्या अयोध्याच्या दिशेने धावणार आहेत.

ayodhya special train jpg webp

मध्य रेल्वेच्या पाचही विभागांतून एकूण ४६ आस्था ते अयोध्या विशेष प्रीपेड ट्रेन चालवणार आहे. यापैकी ३० (१५ अप आणि १५ डाऊन) गाड्या मुंबई सीएसएमटी ते अयोध्येपर्यंत धावतील. पहिली आस्था ते अयोध्या स्पेशल ट्रेन २९ जानेवारी २०२४ रोजी सीएसएमटी येथून सुटेल. आस्था से अयोध्या विशेष ट्रेनच्या पूर्ण खर्च भाजप, आरएसएस आणि विश्व हिंदू परिषद उचलणार आहे. ही ट्रेन मध्य रेल्वे चालवणार आहे तर प्रवाशांसाठी खानपानाची व्यवस्था आयआरसीटीसीकडून करण्यात येणार आहे.

---Advertisement---

मुंबईहून १६ स्पेशल गाड्या –
सीएसएमटी ते अयोध्येपर्यंत एकूण १६ आस्था ते अयोध्या स्पेशल रेल्वे गाड्या चालवण्यात येणार आहे. ही ट्रेन मुंबई सीएसएमटी येथून रात्री १०. ३५ वाजता सुटेल आणि सुमारे ३४ तास ५५ मिनिटे प्रवास केल्यानंतर सकाळी ९.३० वाजता अयोध्या स्थानकावर पोहोचेल. या परतीच्या प्रवासासाठी ही ट्रेन अयोध्येहून दुपारी ४.४० वाजता सुटेल आणि १२. ४० वाजता मुंबईला पोहोचेल.

नाश्ता जळगावात, दुपारचे जेवण भोपाळमध्ये –
मुंबई ते अयोध्या दरम्यानच्या प्रवासादरम्यान राम भक्तांना जळगावमध्ये नाश्ता, खंडवामध्ये दुपारचे जेवण, भोपाळमध्ये रात्रीचे जेवण आणि दुसऱ्या दिवशी कानपूरमध्ये नाश्ता देण्यात येणार आहे. प्रवासादरम्यान आयआरसीटीसी शुद्ध शाकाहारी जेवण आणि नाश्ता देईल.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---