⁠ 
गुरूवार, जुलै 25, 2024

भुसावळमार्गे पुण्याला जाण्यासाठी उद्यापासून धावणार ‘ही’ विशेष एक्सप्रेस : या स्थानकांवर थांबेल?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज : 20 डिसेंबर 2023 : भुसावळ मार्गे पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर आहे. पुणे – मुजफ्फरपूरदरम्यान विशेष गाड़ी चालविण्यात येईल.०५२८६ पुणे – मुजफ्फरपूर सुपरफास्ट एसी साप्ताहिक विशेष एक्सप्रेस- २१ डिसेंबरला आणि २८ डिसेंबरला पुणे येथून रात्री ११ वाजता सुटून शनिवारी ६ वाजता मुजफ्फरपूर येथे पोहचेल.

०५२८५ मुजफ्फरपूर-पुणे सुपरफास्ट एसी साप्ताहिक विशेष एक्सप्रेस- २० डिसेंबरला आणि २७ डिसेंबरला मुजफ्फरपूर येथून दुपारी १ वाजता सुटून गुरुवारी रात्री ९ वा. पुणे येथे पोहचेल.

दौंड कार्ड लाइन, अहमदनगर, कोपरगांव, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, प्रयागराज छिवकी, पं. दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा, दानापूर, पाटलीपुत्र आणि हाजीपूर याठिकाणी थांबा असेल.

गाडीत एसी फर्स्ट -१, एसी टू- २, एसी थ्री-११, एसी थ्री इकॉनॉमी-४, जनरेटर कार – २ आरक्षण डबे असतील. गाड़ी क्रमांक ०५२८६ पुणे – मुज्जफ्फरपूर सुपरफास्ट एसी साप्ताहिक विशेष एक्स्प्रेसचे बुकिंग १८ डिसेंबरपासून सर्व आरक्षण केंद्र आणि वेबसाइट irctc.co.in वर सुरू होईल.