---Advertisement---
नोकरी संधी

8वी पास तरुणांसाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळात नोकरीची संधी; असा करा अर्ज

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळात ८वी पास ते १२वी तरुणांसाठी नोकरीची मोठी संधी चालून आलीय. एमटीडीसी रिसॉर्ट्स डेस्टिनेशन टुरिस्ट गाइड प्रोग्राम २०२४-२५ अंतर्गत ही भरती करण्यात येणार असून या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांना ऑनलाइन ई-मेलच्या माध्यमातून अर्ज करावा लागणार आहे. १५ नोव्हेंबर २०२४ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. MTDC Bharti 2024

MTDC

एमटीडीसी रिसॉर्ट्स डेस्टिनेशन टुरिस्ट गाइड पदासाठी ही भरती केली आहे. ८वी, १०वी आणि १२वी पास असलेले उमेदवार भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र असेल. त्याचसोबत उमेदवाराला मराठी, इंग्रजी आणि हिंदी भाषा बोलता यायला हवी

---Advertisement---

२१ ते ३५ वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवाराला वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे.या नोकरीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.

एमटीडीसीमधील या नोकरीसाठी अर्ज करताना अर्जासोबत उमेदवाराचे नाव, टेलीफोन नंबर हे सर्व ई-मेलवर पाठवायचे आहे. १५ नोव्हेंबर २०२४ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी resortguide@maharashtratourismgov.in या मेल आयडीवर जाऊन मेल करायचा आहे.
जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---