---Advertisement---
जळगाव जिल्हा

याबाबत खासदार रक्षा खडसे करणार पोलिसांकडे कारवाईची मागणी ; नेमकं प्रकरण काय

raksha khadse
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज | 15 मार्च 2024 | आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने महाराष्ट्र्रातील उमेदवारांची यादी जाहीर केली असून यात रावेर लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार रक्षा खडसेंना तिसऱ्या संधी देण्यात आलीय. मात्र रक्षा खडसेंना उमेदवारी मिळाल्याने रावेर लोकसभा संघातील भाजपचे पदाधिकारी नाराज असल्याची असून काहींनी राजीनामे दिले. अशातच रावेर लोकसभा मतदार संघाच्या खासदार रक्षाताई खडसे यांच्या नावाचा गैरफायदा घेत अज्ञात व्यक्तीने रक्षाताई खडसे फॅन क्लब नावने फेसबुकवर पेज तयार करण्यात आले आहे.

raksha khadse

परंतू, हे फेसबुक पेज ऑफिशीअली नाही. या फेसबुक पेजवरून काही पोस्ट टाकून बदनाम करण्याचा प्रयत्न होवून शकतो. यासंदर्भात पोलीस प्रशासनाला निवेदन देवून कारवाई करण्यासंदर्भात मागणी करणार आहे, अशी माहिती खासदार रक्षा खडसे यांनी गुरूवार १४ मार्च रोजी दुपारी १२ वाजता फेसबुकच्या माध्यमातून दिली आहे.

---Advertisement---

रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार रक्षाताई खडसे यांना नुकतेच लोकसभे मतदार संघासाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान या अनुषंगाने अज्ञात व्यक्तीने त्यांच्या नावाने रक्षाताई खडसे फॅन ग्रुप असा फेसबुकवर पेज सुरू केल्याचे समोर आले आहे. ही बाब खासदार रक्षा खडसे याच्या लक्षात आले. यावर रक्षा खडसे यांनी प्रतिक्रिया देतांना सांगितले की, अज्ञात व्यक्तीने “रक्षाताई खडसे फॅन क्लब” नावने फेसबुकवर पेज तयार करण्यात आले आहे.

परंतू, हे पेज ऑफिशीअली किंवा कोणत्या कार्यकर्त्याने सुरू केलेले नाही, या फेसबुक पेजवरून काही पोस्ट टाकून बदनाम करण्याचा प्रयत्न होवून शकतो. यासंदर्भात पोलीस प्रशासनाला निवेदन देवून कारवाई करण्यासंदर्भात मागणी करणार असल्याची माहिती खा. रक्षा खडसे यांनी गुरूवार १४ मार्च रोजी दुपारी १२ वाजता फेसबुकच्या माध्यमातून केली आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---