---Advertisement---
महाराष्ट्र अमळनेर गुन्हे जळगाव जिल्हा राजकारण

MP Bus Accident : मयताच्या कुटुंबियांना प्रत्येकी १० लाखांची मदत द्या, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

---Advertisement---

बचाव कार्यावर स्वतः मुख्यमंत्री लक्ष ठेऊन : अपघातानंतर मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी देखील चर्चा

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ जुलै २०२२ । मध्य प्रदेशात नर्मदा नदीमध्ये आज सकाळी एसटी महामंडळाची बस कोसळून झालेल्या अपघाताबद्धल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले असून असून बचाव कार्य व्यवस्थित पार पाडावे व जखमींवर लगेच उपचारासाठी मध्य प्रदेश मधील जिल्हा प्रशासनाशी योग्य समन्वय ठेवावा असे निर्देश जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच अपघातात मरण पावलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे प्रत्येकी दहा लाख रुपये देण्याची कार्यवाही लगेच करावी असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एस.टी.महामंडळाला दिले आहेत.

mp bus accident jpg webp

अमळनेर डेपोची बस अमळनेर ते इंदूर या मार्गावर बससेवा आहे. अमळनेर डेपोची बस क्रमांक एमएच.४०.एन.९८४८ बस ही इंदूर येथे गेली होती. तेथून परतीच्या प्रवासासाठी बस अमळनेरच्या दिशेने सकाळी ७.३० वाजता निघाली होती. खरगोन आणि धार या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर असणार्‍या कलघाट गावाजवळ संजय पुलावरून सकाळी १० वाजेच्या सुमारास नर्मदा नदीच्या पात्रात ही बस कोसळली. यात सुमारे ४० प्रवासी असून यातील काही प्रवासी बेपत्ता झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. बसमधील १३ प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला असून १५ जणांना वाचविण्यात यश आल्याची माहिती आहे.

---Advertisement---

अपघाताचे वृत्त कळताच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चव्हाण यांच्याशी देखील बोलून मध्यप्रदेश मधील खरगोन व धार जिल्हा प्रशासनाला अपघातग्रस्त व्यक्तींना आवश्यक ते सहकार्य करण्याचे नियोजन करण्याची विनंती केली आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दुर्घटनसंदर्भात मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव तसेच एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांना देखील सूचना केल्या असून बचावलेल्या प्रवाशांना तातडीने आवश्यक ती सर्व मदत करण्याचे निर्देश दिले आहेत. मृतदेह बाहेर काढून योग्य प्रक्रियेनंतर त्यांच्या नातेवाईकांना ताब्यात देण्यासंदर्भातही मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या. मुख्यमंत्री स्वतः मदत कार्यावर लक्ष ठेऊन आहेत.
हे देखील वाचा : MP Bus Accident : अमळनेर डेपोच्या बस अपघातावेळी नेमके काय घडले?

जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाने या अपघातासंदर्भात एक नियंत्रण कक्ष स्थापन केल्याची माहिती देखील जळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना दिली आहे. या नियंत्रण कक्षाचा क्रमांक ०२५७-२२२३१८० आणि ०२५७-२२१७१९३ असा आहे. आज सकाळी इंदोर होऊन अमळनेर कडे निघालेली एसटी महामंडळाची बस मध्य प्रदेश मधील खलघाट आणि टिकरी यामधील नदी पुलावर नदीच्या पुलावरून नर्मदा नदीत कोसळण्याची घटना घडली आहे. जळगाव जिल्हाधिकारी अभिजीत राऊत सतत मध्यप्रदेश प्रशासनाच्या संपर्कात आहेत.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---