---Advertisement---
राजकारण जळगाव जिल्हा महाराष्ट्र

Eknath Shinde Updates : माझ्याकडे ४० पेक्षा जास्तीचे आमदार आहेत : एकनाथ शिंदे

eknath-shinde
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जून २०२२ । माझ्याकडे आज ४० पेक्षा जास्त आमदार आहेत. कालपेक्षा आज जास्त आमदार असून सर्व माझ्यासोबत आहेत. आमदारांना कोणतीही जबरदस्ती करण्यात आलेली नसल्याचे बंडखोर मंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेत ते बोलत होते. आमदारांचा एक मोठा गट सोबत घेऊन बाहेर पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिलेली आहे. (40 MLAs with Eknath Shinde)

eknath-shinde

एकनाथ शिंदे म्हणाले कि, काल सुरत येथे मिलिंद नार्वेकर आणि पाठक मला भेटण्यासाठी आलेले होते. त्याठिकाणी त्यांनी कोणताही प्रस्ताव दिला नाही अथवा कोणतीही चर्चा त्याठिकाणी झालेली नाही. एकीकडे माझ्यासोबत चर्चेसाठी बोलाविले जाते आणि दुसरीकडे मी कोणतीही पक्षविरोधी कारवाई केलेली नसताना मला गटनेते पदावरून काढले, माझे पुतळे जाळले, माझी बदनामी सुरु केली, असे प्रकार सुरु आहेत. सध्या घडत असलेल्या प्रकारांबद्दल मी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना देखील तसे सांगितले आहे.

---Advertisement---

माझ्यासोबत असलेल्या आमदारांचे म्हणणे आणि त्यांच्या अडचणीबाबत मी वारंवार पक्षप्रमुखांना सांगितले आहे. काल पक्षाकडून झालेली गटनेत्याची निवड नियमबाह्य आहे. माझ्याकडे आमदारांचा एक मोठा गट असून त्या आधारे मीच गटनेता असल्याची प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. राज्याच्या राजकारणात घडत असलेली सर्वात मोठी घडामोड सध्या सर्वांना पाहायला मिळत असून नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे आमदारांचा एका मोठा गट घेऊन बाहेर पडले आहे.

एकनाथ शिंदेंसह सर्व आमदार सुरुवातीला अहमदाबाद त्यानंतर सुरत येथे थांबले होते. मध्यरात्री सर्व आमदारांना आसाम येथे हलविण्यात आले आहे. दुसरीकडे महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठकांवर बैठका सुरु आहे. सरकार कोसळणार कि काही तडजोड करून महाराष्ट्रात पुन्हा नव्याने सरकार स्थापन होईल याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---