---Advertisement---
वाणिज्य

रेशनकार्डधारक अडचणीत! २ कोटींहून अधिक कार्ड रद्द, सरकारची मोठी माहिती

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ जुलै २०२२ । तुम्ही जर शिधापत्रिकाधारक (Ration Card) असाल तर ही बातमी काळजीपूर्वक वाचा. याबाबत राज्यसभा खासदार सुशील कुमार मोदी (Sushil Kumar Modi) यांनी प्रश्न विचारल्यानंतर मोठी माहिती समोर आली आहे. अलीकडेच, राज्यसभेत भाजप खासदार सुशील कुमार मोदी यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना, ग्रामीण विकास आणि ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांनी मोठी माहिती दिली आहे. गेल्या पाच वर्षांत मोठ्या प्रमाणात शिधापत्रिका रद्द करण्यात आल्या आहेत. यात महाराष्ट्रातील तब्बल २१ लाख शिधापत्रिका रद्द करण्यात आले आहे.

ration card

केंद्रीय राज्यमंत्री म्हणाले की, 2017 ते 20-21 या पाच वर्षांत देशभरात डुप्लिकेट, अपात्र आणि बनावट अशी एकूण 2 कोटी 41 लाख शिधापत्रिका रद्द करण्यात आली आहेत. एकट्या बिहार राज्यात सात लाख १० हजार शिधापत्रिका रद्द करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. साध्वी निरंजन ज्योती म्हणाल्या की, बिहारमध्ये 2018 मध्ये 2.18 लाख, 2019 मध्ये 3.92 लाख, 2020 मध्ये 99,404, एकूण 7 लाख 10 हजार शिधापत्रिका रद्द करण्यात आल्या. उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक १.४२ कोटी शिधापत्रिका रद्द करण्यात आल्या आहेत. याशिवाय महाराष्ट्र राज्यात २१.०३ लाख शिधापत्रिका रद्द करण्यात आल्या आहेत.

---Advertisement---

ही बातमी सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली
यापूर्वी, यूपीमध्ये शिधापत्रिकाधारकांनी त्यांचे कार्ड सरेंडर केल्याच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या. अपात्र शिधापत्रिकाधारकांना तहसीलमध्ये जाऊन रेशनकार्ड सरेंडर करावे लागत असल्याचा दावा या बातमीत करण्यात येत होता. अन्यथा त्यांच्याकडून शासनाकडून रेशन वसूल केले जाईल. मात्र, नंतर यावर स्पष्टीकरण देताना यूपीच्या योगी सरकारने असा कोणताही नियम केला नसल्याचे सांगण्यात आले.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---