⁠ 
शनिवार, डिसेंबर 14, 2024
Home | जळगाव जिल्हा | आनंदाची बातमी ! भुसावळमार्गे मुंबई-पुण्यासाठी उन्हाळी विशेष रेल्वे गाड्या धावणार

आनंदाची बातमी ! भुसावळमार्गे मुंबई-पुण्यासाठी उन्हाळी विशेष रेल्वे गाड्या धावणार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ एप्रिल २०२४ । प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने उन्हाळी विशेष रेल्वे सेवा चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्या भुसावळमार्गे धावणार असल्याने भुसावळ, जळगावकरांची सोय झाली आहे.

या विशेष गाड्या धावणार :
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- मऊ विशेष (४ फेर्‍या)
०१०७९ विशेष गाडी बुधवारी दि. १०.०४.२०२४ आणि दि. ०१.०५.२०२४ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून २२.३५ वाजता सुटेल आणि मऊ येथे तिसऱ्या दिवशी ११.१० वाजता पोहोचेल. (२ फेर्‍या)
०१०८० विशेष गाडी शुक्रवार दि. १२.०४.२०२४ आणि दि. ०३.०५.२०२४ रोजी मऊ येथून १३.१० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे तिसऱ्या दिवशी ००.४० वाजता पोहोचेल. (२ फेर्‍या)
थांबे: दादर, ठाणे कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळ, बीना, विरांगना लक्ष्मीबाई झांसी, उरई, गोविन्दपुरी, फतेहपुर, प्रयागराज, जंघई, जौनपूर, शाहगंज आणि आज़मगड.
संरचना: २ वातानुकूलित – तृतीय, १८ शयनयान आणि २ लगेज कम गार्डची ब्रेक व्हॅन. (२२ डब्बे)

पुणे ते दानापूर विशेष (८ फेर्‍या)
०१४७१ विशेष गाडी गुरुवार आणि रविवारी दि. ११.०४.२०२४ , १४.०४.२०२४ आणि दि. ०२.०५.२०२४ , ०५.०५.२०२४ रोजी पुणे येथून ०६.३० वाजता सुटेल आणि दानापुर येथे दुसऱ्या दिवशी १२.०० वाजता पोहोचेल. (४फेर्‍या)
०१४७२ विशेष गाडी शुक्रवार आणि सोमवारी दि. १२.०४.२०२४ , १५.०४.२०२४ आणि दि. ०३.०५.२०२४ , ०६.०५.२०२४ रोजी दानापूर येथून १३.३० वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी १९.४५ वाजता पोहोचेल. (४फेर्‍या)
थांबे : हडपसर, दौड़ कॉर्ड लाइन, अहमदनगर, कोपरगांव, मनमाड, भुसावल, खंडवा, इटारसी, पिपरिया, जबलपुर, कटनी, सतना, मानिकपुर, प्रयागराज छिवकी, पंडित दिनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर, आणि आरा.
संरचना: २ वातानुकूलित – तृतीय, १८ शयनयान आणि २ लगेज कम गार्डची ब्रेक व्हॅन. (२२ डब्बे)

नागपूर ते पुणे विशेष (१९ फेर्‍या)
०११६५ विशेष गाडी सोमवार आणि शनिवारी दि. १३.०४.२०२४ ते १५.०६.२०२४ पर्यंत नागपूर येथून १९.४० वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी ११.२५ वाजता पोहोचेल. (१९ फेर्‍या)
०११६६ विशेष गाडी मंगळवार आणि रविवारी दि. १४.०४.२०२४ ते १६.०६.२०२४ पर्यंत पुणे येथून १५.५० वाजता सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी ०६.३० वाजता पोहोचेल. (१९ फेर्‍या)
थांबे : वर्धा, धामणगांव, बडनेरा, अकोला, शेगांव, मलकापुर, भुसावल, मनमाड, कोपरगाँव, बेलापुर, अहमदनगर, दौड़ कॉर्ड लाइन आणि उरली
संरचना: २ वातानुकूलित-द्वितीय , १० वातानुकूलित-तृतीय, १ गार्ड्स ब्रेक व्हॅनसह ४ जनरल सेकंड क्लास डबे.

या विशेष गाड्यांच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा. प्रवाशांनी या उन्हाळी विशेष रेल्वे सेवांचा लाभ घ्यावा असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.