⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | हवामान | Monsoon Update : आला रे आला.. अखेर मान्सून महाराष्ट्रात दाखल

Monsoon Update : आला रे आला.. अखेर मान्सून महाराष्ट्रात दाखल

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १० जून २०२२ । मागील काही दिवसापासून मान्सूनच्या प्रतीक्षेत असलेल्या महाराष्ट्रातील सर्वांसाठीच एक आनंदाची बातमी समोर आली आहे. अखेर आज (10 जून) रोजी नैऋत्य मान्सून कोकणात दाखल झाला आहे. झाल्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे (Kharif Season) खरिपाच्या पेरणीच्या प्रतिक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून पुढील आठवड्यापर्यंत मान्सून पू्र्ण क्षमतेने दाखल होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

दरम्यान, मागच्या वर्षी मान्सून 7 जूनला तळकोकणात दाखल झाला होता. तर यावर्षी महाराष्ट्रात यायला मान्सूनला तीन दिवस उशीर झाला आहे. यंदा 29 मे रोजीच केरळात आगमन झालेल्या मान्सूनचा पुढे प्रवास खडतर झाल्याने राज्यात मान्सूनचे आगमन होण्यास उशिर झाला होता. आगमनानंतर दोनच दिवसांमध्ये केरळ राज्य आणि कर्नाटक किनारपट्टी व्यापून टाकल्याने राज्यातही दणक्यात आगमन होणार असे वाटत असतानाच मान्सूनचा वेग मंदावला होता. गेल्या आठवड्याभरापासून अरबी समुद्रापासून मान्सूनची प्रगती झाली नव्हती. त्यामुळे राज्यात मान्सूनचे आगमन लांबणीवर पडले होते.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढच्या 24 तासांत मान्सून कोकणात दाखल होणार असल्याचा अंदाज वर्तवला होता. भारतीय विभागानं सांगितलेल्या अंदाजानुसार मान्सून अखेर कोकणात दाखल झाला आहे.

अद्यापही खरिपातील पेरण्यांना उशिर झालेला नाही. पण पाऊसच नसल्याने शेतकरी चिंतातूर झाला होता. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाचे आगमन होणार यामुळे शेतकऱ्यांनी मशागतीची कामे आटोपली होती. पण हवामान विभागाच्या अंदाजाप्रमाणे पावसाने हजेरीच लावलेली नाही. अजूनही परेणृीला उशिर झाला नाही, आता कोकणात आगमन झाल्याने वेळेत मान्सून राज्यात सक्रीय झाला तर सर्वकाही वेळेत होणार असल्याचे कृषितज्ञ रामेश्वर चांडक यांनी सांगितले.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.