---Advertisement---
हवामान राष्ट्रीय

आनंदाची बातमी ! येत्या 4 दिवसात मान्सून केरळात धडकणार, महाराष्ट्रात कधी दाखल होईल?

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ मे २०२४ । महाराष्ट्रासह देशातील अनेक भागात तापमानाने ४५ अंशापर्यंत मजल मारली असून यामुळे तीव्र उष्णता जाणवत आहे. या असह्य होणाऱ्या उष्णतेमुळे नागरिक होरपळून निघत आहे. दरम्यान, अशातच नागरिक आता मान्सूनच्या पावसाची वाट पाहत असून अशातच भारतीय हवामानशास्त्र विभागाने नैऋत्य मोसमी अर्थात मान्सूनबाबत आनंदाची बातमी दिलीय.

monsoon 24 jpg webp

देशात मान्सून अर्थात मोमी पावसासाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली असून, येत्या चार दिवसांत तो केरळमध्ये धडक देईल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला आहे. मान्सून दरवर्षी १ जून रोजी केरळमध्ये वर्दी देतो. मात्र, या सुधारित अंदाजनुसार तो एक दिवस आधीच अर्थात ३१ मे रोजीच धडकणार आहे. यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांसह शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.

---Advertisement---

हवामान खात्याने सोमवारी (दि २७) नैऋत्य मोसमी अर्थात मान्सूनचा जून-सप्टेंबर या चार महिन्यांच्या काळासाठी दीर्घश्रेणीचा अंदाज व्यक्त केला. त्यानुसार ३१ मे रोजी मान्सून केरळात दाखल होण्याचा अंदाज वर्तविला आहे. तसेच यंदा देशात सरासरी इतका पाऊस पडण्याचा अंदाज असून, ईशान्य भारत वगळता देशाच्या अन्य भागात मान्सून सरासरी किंवा त्यापेक्षा जास्त असण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. देशभरात सरासरीच्या १०६ टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. यात मान्सूनच्या प्रारूपानुसार ४ टक्के फरक पडेल, अशी माहिती विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी दिली.

मान्सूनच्या पावसाबाबत हवामान खात्याने सांगितले की, ईशान्य भारतात सामान्यपेक्षा कमी, उत्तर-पश्चिममध्ये सामान्य आणि मध्य आणि दक्षिण भारतात सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने आपल्या अहवालात म्हटले आहे की, देशातील काही भाग वगळता जून महिन्यात कमाल तापमान सामान्य किंवा सामान्यपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, यावेळी देशात नेहमीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे.

दरम्यान, राज्यासह देशातील उत्तर भारतात सध्या उष्णतेची लाट कायम आहे. यातच मान्सूनमुळे उष्णतेची लाट पुढील तीन दिवसात काही प्रमाणात कमी होईल असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान देशातील काही भाग वगळता जून महिन्यात कमाल तापमान सामान्य किंवा सामान्यपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज आहे.

या अंदाजानुसार…
मध्य भारत आणि दक्षिण भारतात १०६ टक्क्यांपेक्षा जास्त, वायव्य भारतात ९२ ते १०८ टक्के अर्थात सरासरी इतका आणि ईशान्य भारतात सरासरीपेक्षा कमी अर्थात ९४ टक्क्यांपेक्षा कमी असण्याची शक्यता आहे. – मान्सूनचा कोअर झोन अर्थात मध्य भारतात सरासरीपेक्षा जास्त (१०६ टक्क्यांपेक्षा जास्त) असल्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. जूनमध्ये देशभरात सामान्य पाऊस (९२ ते १०८ टक्के) पडण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात कधी दाखल होईल?
10 जून दरम्यान मुंबईसह कोकणात मान्सूनच आगमन होण्याची शक्यता आहे. तर 15 जूनपर्यंत मान्सूनचं नाशिक, पुणे, कोल्हापूर, सोलापूरसह मराठवाडा विदर्भात आगमन होण्याचा अंदाज आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---