---Advertisement---
जळगाव जिल्हा हवामान

खुशखबर! मान्सून निकोबार बेटांवर दाखल, महाराष्ट्रात कधी पोहोचणार?

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ मे २०२५ । मान्सून पावसाबाबत एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे यंदा १७ वर्षानंतर मान्सून नियोजित कालावधीच्या चार दिवस आधी केरळमध्ये पोहोचणार आहे. यंदा मान्सून २७ मे २०२५ पर्यंत केरळ किनाऱ्यावर पोहोचणार आहे.

rain 1 jpg webp webp

सध्या मान्सून निकोबार बेटे, दक्षिण अंदमान समुद्र, पूर्व बंगाल उपसागराच्या काही भागांत पोहोचला आहे. नैऋत्य मोसमी वारे माले, पूर्व बंगाल उपसागर, निकोबार बेट व मध्य अंदमान समुद्रातून जातो. १५ किंवा १६ मे पर्यंत मान्सून वेगाने पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर तो दक्षिण अरबी समुद्रात प्रवेश करेल आणि श्रीलंकेचा काही भाग, दक्षिण बंगाल उपसागराचा काही भाग आणि संपूर्ण अंदमान बेटे व्यापेल, असे हवामान खात्याने म्हटले आहे.
पुढील २ दिवसांत बहुतेक राज्यांत पावसाची शक्यता आहे. १४ मे पर्यंत महाराष्ट्रात वादळीवारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे. मध्यप्रदेश, छत्तीसगड, प. बंगाल, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, तामिळनाडू व सिक्कीममध्येही पावसाची शक्यता आहे.

---Advertisement---

मान्सून केव्हा आणि कुठे येण्याची शक्यता….
१५ मे : अंदमान आणि निकोबार
१ जून : केरळ, तामिळनाडू, लक्षद्वीप, आसाम, मेघालय
५ जून: गोवा, आंध्र प्रदेश किनारपट्टी, कर्नाटक, पश्चिम बंगाल
६ जून: महाराष्ट्र, आंध्र प्रदेशचे किनारपट्टी व्यतिरिक्त जिल्हे,
१० जून : मध्य महाराष्ट्र, मुंबई, तेलंगणा, छत्तीसगड, ओडिसा, झारखंड, बिहार
१५ जून : गुजरात, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश
२० जून: गुजरात, राजस्थान, उत्तराखंड, दिल्ली
२५ जून: राजस्थान, हरियाणा, उत्तर प्रदेश
३० जून : राजस्थान, नवी दिल्ली

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---

Leave a Comment