जळगाव लाईव्ह न्यूज । ०३ जून २०२१ । आतुरतेने वाट पाहत असलेल्या मान्सूनची अखेर केरळात एन्ट्री झाली आहे. केरळमध्ये मान्सून दाखल झाल्याची माहिती भारतीय हवामान विभागानं दिली आहे. तो १० ते ११ जूनपर्यंत महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता, भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे. यंदाचा मान्सून पाऊस सरासरीच्या सामान्य राहिल, असा अंदाज हवामान विभागाने यापूर्वीचं वर्तवला आहे.
गेल्या काही दिवसांपासूनच दक्षिण – पश्चिम मान्सून केरळमध्ये पोहचणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. केरळमध्ये यंदा मान्सून सामान्य परिस्थितीपेक्षा थोड्या उशिरानं दाखल होत असल्याचं, भारतीय हवामान विज्ञान विभागाचं (IMD) म्हणणं आहे. दोन दिवस उशिरानं दाखल होत असला तरी आता येत्या काही तासांत केरळमध्ये रिमझिम पावसाला सुरूवात होऊ शकते.
यंदाचे पर्जन्यमान कसे असेल?
स्कायमेटच्या अंदाजानुसार जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर चार महिन्यांत सरासरीच्या बीबीएम .6 मिमीच्या तुलनेत 2021 मध्ये 103 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामध्ये 5 टक्के कमी किंवा अधिक असू शकते. पावसाळ्याच्या प्रादेशिक कामगिरीवर स्कायमेटचा अंदाज आहे की उत्तर भारत आणि ईशान्य भारतातील काही भागांत संपूर्ण हंगामात पाऊस पडण्याची शक्यता आहे.
तुमच्या राज्यात कधी दाखल होणार?
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मान्सून पुढे सरकत इतर राज्यांत या तारखांना दाखल होऊ शकतो…
केरळ : ३ जून
महाराष्ट्र : ११ जून
तेलंगणा : ११ जून
पश्चिम बंगाल : १२ जून
ओडिशा : १३ जून
झारखंड : १४ जून
बिहार आणि छत्तीसगड : १६ जून
उत्तराखंड – मध्य प्रदेश : २० जून
उत्तर प्रदेश : २३ जून
गुजरात : २६ जून
दिल्ली – हरयाणा : २७ जून
पंजाब : २८ मे
राजस्थान : २९ जून