जळगाव लाईव्ह न्यूज । १७ ऑक्टोबर २०२१ । जिल्ह्यातील एका खाजगी संस्थेत नर्सिंगचे प्रशिक्षण घेणाऱ्या २३ वर्षीय विद्यार्थिनीने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना रविवारी रात्री उघडकीस आली. दरम्यान, आई-बाबा, मला माफ करा.. अशा आशयाची सुसाईड नोट तिने लिहिलेली होती.
वर्धा जिल्ह्यातील मूळ रहिवासी असलेली कल्याणी लक्ष्मण मेश्राम ही विद्यार्थिनी जळगावातील खाजगी हॉस्पिटलमध्ये नर्सिंग संदर्भात प्रशिक्षण घेत होती. ती नशिराबाद येथील मुक्तेश्वर नगरात राहत होती. तरुणीने राहत्या घरात ओढणीच्या सहाय्याने गळफास घेउन आत्महत्या केल्याची घटना रविवारी रात्री उघडकीस आली. नशिराबाद पोलिसांना बोलवून उघडण्यात आला. दरवाजा उघडण्यात आला त्यावेळी कल्याणी ही गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. तिच्या नाकातून रक्तस्त्राव झाल्याचेही दिसून आले.
याप्रकरणी रात्री उशिरा नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद आहे. दरम्यान, ‘आई बाबा, मला माफ करा अशा आशयाची सुसाइड नोट पोलिसांना मिळून आली असून सुसाईड नोटमध्ये तिने मी स्वखुशीने आत्महत्या करीत असून माझा दफनविधी करावा, असे नमूद आहे. पुढील तपास उप पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र साळुंखे करीत असून घटनास्थळी रवींद्र इंधाटे व पोलीस कर्मचाऱ्यांनी पाहणी केली.